ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

तिसरा डोळा!

समाजात सध्या लैंगिक स्वैराचार इतका वाढलाय की अन्न वस्त्र निवारा या पेक्षाही वासना लोकांना महत्वाची वाटू लागलीय त्यासाठी माणूस पशू बनत चालला आहे.पाप पुण्याचा विचार करायचे त्याने सोडून दिले आहे मुलगा वयात आला कीत्याला मिसरूड फुटायचा आतच त्याच्या मनात स्त्री देहाचं आकर्षण स्त्रीचा उघडा देह पाहण्यासाठी त्याची नजर आसुसलेली असते . कारण त्याच्या हातातील मोबाईल मध्ये ज्या अश्लील साईट असतात त्यावर त्याने जे पाहिलेले असते ते त्याला बघायचे असते आणि पुरुषांच्या याच घाणेरड्या मानसिकतेतून महिलांच्या प्रसाधन गृहात, मॉल मधील चेंजिंग रूम मध्ये छुपे कॅमेरे लावले जातात काही नराधम तर त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपल्याच घरातील बाथरूम मध्ये छुपे कॅमेरे लावतात . पण स्त्री देहाच्या आकर्षणापोटी असे प्रकार करणे म्हणजे एक प्रकारची विकृती आहे त्यामुळे अशा गुन्ह्यात केवळ काही वर्षांचा तुरुंगवास नसावा तर अशा गुन्ह्यात एकतर फाशीची शिक्षा असावी किंवा आरोपींचे लिंग छाटून टाकण्याची शिक्षा असायला हवी कारण एकीकडे स्त्रीला देवीचा दर्जा देऊन तिची पूजा करायची आणि दुसरीकडे स्त्रीकडे वाईट नजरेने बघायचे हे कुठे तरी थांबायला हवे .चादिगड युनिव्हर्सिटीच्या छत्रल्यात मुलींच्या बाथरूम मध्ये कॅमेरे लावून मुलींचे आंघोळी करतानाचे चित्रण करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना कठोर शिक्षा व्हायला हवी त्यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती मिळता नये

कारण त्यांनी जे काही केलेलं आहे ते भयानक आहे छत्रल्यातिल एका विद्यार्थिनीला हाताशी धरून तिथल्या काही विद्यार्थ्यांनी हा घाणेरडा प्रकार केलाय त्यांच्या या घाणेरड्या प्रकारामुळे काही मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळे हे कृत्य करणाऱ्यांचे आयुष्य उध्वस्त व्हायला हवे भविष्यात त्यांना कुठल्याही शिक्षण संस्थेत प्रवेश दिला जाऊ नये किंवा त्यांना कुठेही नोकरी मिळणार नाही अशी व्यवस्था व्हायला हवी आणि त्याहीपेक्षा जर कठोर शिक्षा द्यायची असेल तर त्यांचे लिंग छाटून त्याला कायमचे नपुंसक करायला हवे.तरच हे असे प्रकार थांबतील आणि ही काही पहिलीच घटना नाही या पूर्वी सुधा अशा घटना घडलेल्या आहेत मात्र शाळा कॉलेज किंवा मुलींच्या छत्राल्यात अशा घटना घडणे खूप भयंकर आहे आणि त्याहीपेक्षा जर काय भयंकर असेल तर अशा प्रकारे महिलांच्या बाथरूम किंवा चेंजींग रूम मध्ये छुपे कॅमेरे लावून मुलींचे विवस्त्र चित्रीकरण करणे .आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करणे हा प्रकार खूपच वाईट आणि एखाद्या महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा आहे . त्यामुळे सरकारने अशा घटनांची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे एकीकडे बेटी बचाव बेटी पडाव चे नारे दिले जात आहेत . महिलांना राजकीय क्षेत्रात आरक्षण दिले जात आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारे महिलांचे शोषण केले जात आहे हा एक प्रकारे दुटप्पीपणा आहे तो थांबवावा आणि चंदीगड एम एम एस कांडातील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी लोक करीत आहेत .

error: Content is protected !!