ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

एन सी बी विरुद्ध नवाब मलिक यांच्यातील वाद शिगेला वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात डांबणार -आर्यन ची दिवाळी तुरुंगात?

मुंबई/ आर्यन खान ड्रग प्रकरणात नवाब मलिक आणि एन सी बी यांच्यातील वाद आता टिपेला पोचला असून एन सी बी चे अधिकारी समीर वानखेडे यांना आम्ही वर्षभरात तुरुंगात डांबणार असे काल नवाब मलिक यांनी सांगितले तर नवाब मलिक यांच्या आरोपांना आम्ही फारसे महत्व देत नाही असे एन सी बी चे अधिकारी अप्रत्यक्षपणे सांगत आहेत .दरम्यान काल आर्यन खान याच्या जमीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने ३० ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली असल्याने आर्यन ची दिवाळी तुरुंगात जाण्याची शक्यता आहे .
काल दुपारी आर्यन खान याच्या जमीन अर्जावर सुनावणी होऊन त्याची न्यालयीन कोठडी वाढवल्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप करताना त्यांनी दुबई आणि मालदीव येथे जाऊन दोन कोटी रुपये खंडणी घेतल्याचा आरोप केला .तसेच या संपूर्ण प्रकरणाची आम्ही चौकशी करून वानखेडे यांना पुढील वर्षभरात तुरुंगात डांबणार असल्याचे सांगितले सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एन सी बी मध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रियाला अटक करण्यात आली असे सांगून मलिक यांनी वानखेडे यांच्या कुटुंबीयांचे दुबई आणि मालदीव मधील काही फोटोही दाखवले .दरम्यान जस्मिन वानखेडे यांच्यावर आरोप करणे बंद करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा मनसेने दिला आहे . तर एन सी बी ने मात्र अशा आरोपांना आम्ही भीक घालीत नाही असे दाखवून देत नवाब मलिक यांच्याकडे दुर्लक्षच केले आहे .


बॉक्स/शाहरुख खान आर्थर रोड जेल मध्ये
सध्या ड्रग प्रकरणात अटकेत असलेल्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी काल शाहरुख खान सकाळी ९ वाजता आर्थर रोड जेल मध्ये आला होता यावेळी फक्त दहा मिनिटेच त्याची आर्यन सोबत भेट झाली

error: Content is protected !!