ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अपयशी इंटरपोल

इंटरपोल अर्थात आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना! सध्या भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत इंतरपोलचे महाअधिवेशन सुरू आहे आणि त्यासाठी जगभरातील 195 देशांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला हजर आहेत.पण अशा प्रकारची अधिवेशने घेऊन आणि त्यात गुन्हेगारी रोखण्याच्या उपायांवर केवळ चर्चा करून जगभरातील गुन्हेगारीला आळा घालणे शक्य आहे का ? या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर कुणालाही देता येणार नाही .याचे कारण म्हणजे गुन्हेगारीला आळा घालण्याची जबाबदारी ज्या लोकांवर आहे असे लोकच सतेमधे बसलेले असल्याने इंटरपोल सारख्या संघटनेने किती जरी प्रयत्न केले तरी त्यांना जोवर त्यात्या देशातील सरकारची साथ मिळत नाही तोवर इंटरपोल सारख्या संघटनांचे गुन्हेगारी रोखण्याचे प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही आणि याच वस्तुस्थितीवर इंटरपोल चां अधिवेशनात चर्चा होणे आवश्यक आहे.जगभरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी तब्बल 177 देशांनी एकत्र येवून 1923 साली इंटरपोल ची स्थापना केली.आज तब्बल 192 देश या संघटनेचे सदस्य आहेत.या संघटनेचे फ्रान्स मध्ये कार्यालय असून 500 हून अधिक कर्मचारी या संघटनेकडे आहेत.तब्बल 5.9 लाख अमेरिकन डॉलर इतका या संघटनेचा बजेट आहे .यावरून ही संघटना किती मोठी असेल याची कल्पना येते. पण संघटना केवळ मोठी असून चालत नाही तर त्या संघटनेचे काम सुधा तितकेच मोठे असायला हवेत.इंटरपोल सारख्या संघटनांनी ज्या मोठ्या माफियांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले त्यांना अजूनपर्यंत इंटरपोल सारख्या संघटना पकडू शकल्या नाहीत.लादेन आणि अल जवाहिर सारख्या कुख्यात दहशतवादी सैतानांना अमेरिकेने त्यांच्या गुप्तहेर संघटनांच्या माध्यमातून शोधून काढले आणि त्यांचा खात्मा केला वास्तविक हे काम इंटरपोल चे होते . कारण अमेरिकेतील 9/11 क्या हल्ल्यानंतर लादेन आणि जवाहीर दोघानाही इंटरपोल ने फरार घोषित केले होते पण त्यांना पकडण्यात इंटरपोल आणि इतर तपास यंत्रणांना यश आले नाही . मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेला दाऊद आणि त्याचे साथीदार पाकिस्तानात आहेत .पाकिस्तान इंटरपोल चां सदस्य आहे आणि दिल्लीतील इंतरपोल चां अधिवेशनाला पाकिस्तानचे प्रतिनिधी उपस्थित आहेत अशावेळी इंटरपोल ने त्यांची कॉलर पकडुन त्यांना दाऊद विषयी विचारायला हवे पण इंटरपोल तसे करील असे वाटत नाही आणि हीच जर इंटरपोल ची हतबलता असेल त

इंटरपोल सारख्या आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांच्या समोर आज नेमक्या कोणत्या अडचणी आहेत त्या सर्व देशांनी समजून घ्यायला हव्यात कारण इंटरपोल सारख्या संघटनांना बळ देऊन मजबूत करणे ही काळाची गरज आहे .कारण जगातील गुन्हेगारीचे उच्छाद मांडला आहे त्यामुळे ही गुन्हेगारी आटोक्यात यायला हवी आणि कायद्यावर विश्वास ठेऊन शांततेने जीवन जगू इच्छिणाऱ्या माणसाचे जगणे सुकर व्हायला हवे.आज जगासमोर इस्लामी दहशतवाद आणि सायबर क्राईम ही दोन मोठी आव्हाने आहेत आणि त्यांचा सामना करायचा असेल तर इंटरपोल सारख्या आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा बळकट व्हायला हव्यात.आणि याच महत्वाच्या विषयावर इंटरपोल चां अधिवेशनात चर्चा व्हायला हवी.केवळ दहशतवादाविरुद्ध सर्वांनी एकत्रित लढा उभारला हवा एवढे बोलून चालणार नाही तर या लढ्यातील एक प्रमुख हत्यार असलेली इंटरपोल संघटना मजबूत व्हायला हवी तरच दहशतवाद विरोधी लढ्याला यश येईल

error: Content is protected !!