ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

विधानसभेसाठी भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर


मुंबई/येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यामध्ये ८० आमदाराला पुन्हा तिकीट देण्यात आले आहे तर काही आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कामठी मतदार संघातून तिकीट घेण्यात आले आहे तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम मधून तिकीट देण्यात आले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढवतील
भाजपाचे मुंबई तील उमेदवार
मिहीर कोटेच्या/मुलुंड
अतुल भातखळकर/कांदिवली पूर्व
योगेश सागर/चारकोप
विनोद शेलार/मालाड पश्चिम
विद्या ठाकूर/गोरेगाव
अमित साटम/अंधेरी पश्चिम
पराग अळवणी/विलेपार्ले
राम कदम/घाटकोपर पश्चिम
आशिष शेलार/मांजरे पश्चिम
तामिळ सेलवन/सायन कोळीवाडा
कालिदास कोळबकर/वडाळा
मंगल प्रभात लोढा/मलबार हिल
राहुल नार्वेकर/कुलाबा
दरम्यान मुंबईतील शिवडी आणि वरळी या दोन मतदारसंघांमध्ये भाजपने उमेदवार दिले नाही याचे कारण शिवडी मधून मनसेच्या बाळा नांदगावकर यांची उमेदवारी यापूर्वी जाहीर झाली आहे तर आदित्य ठाकरे च्या वरळी मतदारसंघात मनसेचे संदीप देशपांडे यांना उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशा वेळी जर मनसेची भाजप बरोबर काही अंडरस्टँडिंग झाली तर शिवडी आणि वरळी हे दोन मतदारसंघ मनसेला सोडले जाते आणि तिथे महायुतीचा कोणताही उमेदवार उभा केला जाणार नाही त्यामुळे मनसेने भलेही स्वबळाचा नारा दिलेला असला तरी काही मतदारसंघांमध्ये महायुती आणि मनसेची अंडरस्टँडिंग झालेली असल्याचे समजते.

error: Content is protected !!