शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव लटकला-पालिकेच्या निर्णयाला टास्क फोर्स चां विरोध
मुंबई/ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले त्यामुळे आता प्रार्थमिक शाळा सुरू करण्यासाठी पालिका आग्रही आहे तसा प्रस्तावही सरकारकडे पाठवण्यात आला आहे पण पालिकेचा आ या निर्णयाला डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने विरोध केला आहे तास्क फोर्स चां म्हणाण्या नुसार लहान मुलांचे अजूनही लसीकरण झालेले नसल्याने शाळा सुरू करण्याचा धोका पालिका किंवा सरकारने पत्करू नये .लहान मुलांचे लसीकरण झाल्यावरच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा असे टास्क फोर्स चां डॉक्टरांनी सांगितले आहे त्यामुळे पहिली ते आठवी पर्यंत चे वर्ग सुरू करण्याचा पालिकेचा प्रस्ताव अधांतरी लटकणार आहे दरम्यान पालक आणि शिक्षकही लहान मुला बाबत रिस्क घ्यायला तयार नसल्याचे समजतेे.