महाराष्ट्रात 66% मतदान- मुंबईतील मतदानाचा टक्का घसरला
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान झाले ६६.११ टक्के इतके मतदान झाले हा टक्का मागील निवडणुकीपेक्षा अधिक आहे सर्वाधिक मतदान कोल्हापूर मध्ये झाले तर सर्वात कमी मतदान मुंबईमध्ये झाली मतदाना ग्रामीण भागात बऱ्यापैकी झाले याचा अर्थ ग्रामीण भागातील जनतेने मतदानात जास्त भाग घेतला होता कालच्या मतदानात चार हजाराहून अधिक उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रणात बंद झाले असून जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिला हे उद्या 23 तारखेला समजणार आहे परंतु महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस आहेत त्याचबरोबर नेहमीप्रमाणे लफंगे एक्झिट पोल वाले वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळे तर्कवितर्क लढवत आहेत आणि महाविकास आघाडीला किती मिळणार आणि महायुतीला किती मिळणार आहे हे सांगत आहेत पण त्यांच्यावर लोकांचा काडीचाही विश्वास राहिलेला नाही.
काल मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी तोडफोडीच्या राडेबाजीच्या घटना घडल्या काही ठिकाणी मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आली तर काही ठिकाणी मतदान करण्यासाठी रांगेत असलेल्या लोकांना धमक्या देण्यात आल्या मात्र तरीही महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात मतदान पार पडले