ए एफ एम सी यांच्या वतीने डॉ.कीर्ती पवार यांचा गौरव
मुंबई/ देशाचे संरक्षण करणाऱ्या आर्मी मध्ये डॉक्टर म्हणून काम करताना तर एक वेगळीच अनुभूती मिळत असते, पण जेंव्हा या कार्याचा गौरव केला जातो त्यावेळचा आनंद काही वेगळाच आणि रोमांचकारी असतो. डॉ.कीर्ती पवार यांनाही असाच अनुभव मिळाला
१७ वर्षांपूर्वी म्हणजे २००३ मध्ये बारामती वरून बसने पुण्याला शिक्षणासाठी जाऊन हडपसर येथील ए एफ एम सी जवळ उतरून आपल्या संशोधनासाठी संदर्भ पुस्तके व मेडिकल जर्नल्स वाचण्यासाठी ज्या ए एफ एम सी कॉलेजच्या लायब्ररीत त्या जायच्या त्याच ए एफ एम. सी कडून भविष्यात आपला कधी गौरव होईल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते पण पुढे त्यांनी त्यांच्याशीच सलग्न क्षेत्रात काम करून एक सेवाभावी डॉक्टर म्हणून जी सेवा बजावली त्याबद्दल ए एफ एम सी कॉलेजच्या प्रमुख कमांडंट लेफ्टनंट जनरल राजश्री रामा सेतू यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी तिन्ही दलांच्या डॉक्टरांनी त्यांना मानवंदना दिली. त्यावेळी त्यांचे पती रेडिओलाॅजीस्ट डाॅ.सतीश पवार देखील उपस्थित होते.