पेपर फुटीचा घोटाळेबाज सुपे निलंबित
मुंबई/ शिक्षक भरती परीक्षेसह म्हाडाच्या नोकर भरती परीक्षेचे पेपर फोडून मालामाल झालेला शिक्षण परिषदेचा घोटाळेबाज आयुक्त तुकाराम सुपे याला अखेर शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी निलंबित केले आहे
सुपे यांनी पेपर फुटीचे मोठे रॅकेट चालवून करोडो रुपये कमावले त्याचा पेपर फोडणाऱ्या १४ टोळ्या बरोबर संबंध होता त्याच्या अटकेनंतर त्याच्या घरावर टाकलेल्या पहिल्या धाडीत ८८ लाख आणि सोने मिळाले तर त्याच्या मेव्हण्याच्या घरावर टाकलेल्या धाडीत २कोटींची रोकड तर दीड किलो सोन्याचे दागिने मिळाले आता सुपेला निलंबित करण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे