ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

के वाय सी केल्याशिवाय शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतील पैसे मिळणार नाहीत

दिल्ली – पीएम किसान योजनेतील मार्च २०२२ नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी शेतकर्यांना यापुढे केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच सीएससी वर ई-केवायसी करून घेण्यासाठी एका खातेदाराला प्रत्येकी १५ रुपये आकारले जाणार आहेत. अशी माहिती केंद्र सरकारच्या सीएससी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार राकेश यांनी सांगितले.
ई केवायसी च्या माध्यमातून इलेक्ट्रोनिक पद्धतीने तुमची ओळख पडताळून पहिली जाते . ई-केवायसी सर्वात प्रथम तुम्हाला पिएम किसान . इन या संकेत स्थळावर हि वेबसाईट उघडल्यावर सर्वात प्रथम तुम्हाला लाल अक्षरात एक सूचना दिसेल त्या सूचनेनुसार के वाय सी करता येते . पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये टाकले जातात. प्रत्येकी दोन हजार अशा तीन हप्त्यात वर्षाला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. या योजनेचा दहावा हप्ता १ जानेवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.

error: Content is protected !!