उपकाराची जान विसरलेला मराठी माणूस
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 105 हुतात्म्यांनी प्राणाचे बलिदान देऊन मुंबई मिळवली मात्र तीच मुंबई आज परप्रांतीयांच्या हाती गेलीय मुंबईतील मराठी टक्का दिवसेंदिवस घासरत चालला आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हककासाठी शिवसेना स्थापन केली आणि तेंव्हा पासून इथल्या मराठी माणसांचे भाग्य उजळले स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी माणसाच्या हाताला काम मिळाले .वडापाव विक्रीच्या माध्यमातून का होईना छोटासा रोजगार मिळाला मराठी माणसाला 1966 चां नंतर खऱ्या अर्थाने अच्छे दीन आले होते अगदी मराठी माणसाचा आवाज मराठी माणसाच्या सरकार मार्फत सर्वत्र घुमट होता मुंबई पूर्णपणे मराठी माणसांच्या ताब्यात होती पण गिरणी कामगारांच्या संपणांतर मुंबईतील सर्व चित्र बदलले बेरोजगार झालेला मराठी माणूस मुंबईतील आपले घरदार विकून मुंबईबाहेर जाऊ लागला .आणि मुंबईवर गुजराती मारवाडी आणि युपी बिहारच्या भय्ये लोकांनी ताबा मिळवला .आणि याला अर्थातच सतेतील आणि सतेबाहेरील मराठी माणूसच कारणीभूत आहे.शिवसेना प्रमुखांच्या दुःखद निधनानंतर शिवसेना बदलली पूर्णपणे राजकीय व्यावसायिक झाली मराठी माणसापेक्षा राजकीय फायद्या तोट्याचे गणित शिवसेनेला अधिक महत्वाचे वाटू लागले आणि त्यानुसार निर्णय घेतले जाऊ लागले .या काळात मराठी माणसाला मनसेचा आधार वाटू लागला कारण हाती सत्ता किंवा कोणतेही अधिकार नसताना मनसेच्या लोकांनी नागरी सुविधांचे प्रश्न सोडवले भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आंदोलने केली केसेस घेतल्या त्यामुळे मनसेची एक विश्वसनीयता निर्माण होऊन त्यांचे १२ आमदार निवडून आले त्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले पण त्याचा उपयोग झाला का ? तर अजिबात नहीं. ज्यांना राज आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून निवडून आणले ते दुसऱ्या पक्षात गेले .तर ज्या मराठी माणसासाठी राज ठाकरे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत तो मराठी माणूस फक्त राज ठाकरेंची भाषणे ऐकण्यात धन्यता मानतो. मतदानाच्या वेळी त्याला काँग्रेस राष्ट्रवादी भाजप हे पक्ष दिसतात हा मराठी मतदारांचा कृतघ्नपणा नाही का ? आज मुंबईत फक्त 23 टक्के मराठी माणूस उरलाय मात्र त्याने जर एक गठ्ठा मतदान केले तरी मराठी माणसाचा आवाज विधिमंडळात घुमेल .पण हे घडायला हवे .मोदींचा भाजपा तेंव्हाही मराठी माणसाच्या बाजूने नव्हता आणि आताही नाही तरीही मराठी माणूस भाजपच्या मागे का जातोय तेच काळात नाही
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात भाजपच्या लोकांनी महारष्ट्र द्रोही कंगनाची बाजू घेऊन महाराष्ट्राला बदनाम केले होते आताही भाजपचे लोक महाराष्ट्रापेक्षा मोदी अमित शहा यांना अधिक महत्त्व देत आहेत .पक्ष म्हणून ठीक आहे पण जेंव्हा आपल्या राज्याच्या मराठी मातीच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न येतो तेंव्हा सुधा भाजप मधले मराठी नेते मोदी शहा यांची बाजू घेणार असतील तर त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा महाराष्ट्र बद्दल बोलण्याचा काहीच अधिकार नाही .काँग्रेस राष्ट्रवादी वाले हे तर तेंव्हाही मराठी माणसांचे नव्हते आणि आताही नाहीत.मराठी माणूस मेळा काय मुंबईतून हद्दपार झाला काय त्यांना मराठी माणसांची काहीच पडलेली नाही तरी काही मराठी लोक काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षांना मतदान करतात आणि मराठी माणसासाठी लढणारे राज ठाकरे आणि त्यांची सभेतील जहाल भाषणे मराठी माणसाला केवळ टाइम पास वाटतात हेच खरे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.मराठी माणूस स्वतःबद्दल आपल्या मराठी अस्मिता बद्दल मराठी भाषेबद्दल आणि मराठीच्या राजकीय भवितव्याबद्दल इतका बेफिकीर कसा तेच कळत नाही .शिवसेना आता पूर्वीसारखी मराठी माणसांची राहिलेली नाही त्यामुळे सेनेला जर राज ठाकरे एक सक्षम पर्याय ठरू शकतं असतील तर या पर्यायाचा मराठी माणसाने जरूर विचार करायला हवा.