राज्यातील निवासी डॉक्टर पुन्हा संपावर
मुंबई/उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर आज पासून पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत त्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे
डॉक्टरांच्या विद्या वेतनात वाढ आणि इतर मागण्यांसाठी 7 फेब्रुवारीला डॉक्टरांनी संपाचा निर्णय घेतला होता परंतु वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्री यांच्याबरोबर बैठक झाली मात्र त्यात कोणत्याही तोडगा निघाला नाही त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर डॉक्टरांच्या प्रतिनिधींची बैठक झाली या बैठकीत दहा हजार रुपये विद्या वेतन वाढवण्याचा निर्णय झाला होता त्यामुळे डॉक्टरांनी संप मागे घेतला होता परंतु उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने किंवा त्याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजुरीला न आल्याने निवासी डॉक्टर संतापले आहेत आणि त्यांनी आज पासून पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार असल्याने राज्यात आरोग्य सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे याबाबत सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही त्यामुळे सरकार रुग्णालयावर अवलंबून असलेल्या गोरगरीब जनतेचे हाल होणार आहेत