महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सी बी एस इ पॅटर्न लागू सत्ताधारी व विरोधक आमने सामने
मुंबई/महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सी बी एस इ पॅटर्न लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आता विरोधी पक्षाकडून जोरदार आक्षेप घेतला जात आहे त्यामुळे या नव्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये सी बी एस इ पॅटर्न करण्याची घोषणा करतात नव्या वादाला तोंड फुटले आहे कारण सीबीएसई पॅटर्नमुळे एस एस सी बोर्डाचे अस्तित्व धोक्यात येणार आहे त्याचबरोबर सीबीएसइ मधे महाराष्ट्रातील इतिहासाबद्दल तसेच भूगोलाबद्दलही फारशी माहिती नसल्यामुळे या पॅटर्नचा महाराष्ट्राच्या आणि प्रत्येक पिढीसमोर आदर्श ठरणाऱ्या इतिहासाची पायामंदी होणार असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पॅटर्न लागू करण्यापूर्वी सरकारने विद्यार्थी पालक शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मंडळींशी चर्चा केली नसल्याचा आरोपही विरोधी पक्षाच्या नेत्याने केला आहे तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व्हावीतव्यासाठी हा पॅटर्न अत्यंत आवश्यक होता इतर अनेक राज्यांमध्ये तो यशस्वी झालेला आहे असे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे पण तरीही या नव्या शैक्षणिक मुद्द्यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
