करोना काळात मंत्र्यांच्या आजारपणात खाजगी हॉस्पिटलचा 1कोटी 40 लाख खर्च -मंत्र्यांचा आजार जनता बेजार
मुंबई/ करोना काळात गरीब जनतेला सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला देणारे मंत्री स्वतः मात्र खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी तिजोरीवर भर टाकीत होते सरकार मधील तब्बल 18 मंत्र्यांनी 1लाख 40 हजाराचे बिल केले आहे.
करोना काळात लोकांची हलत खराब झाली होती एकतर काम धंदा गेला तर दुसरीकडे कोरोनावर उपचार घेणाऱ्यांना खाजगी रुग्णालये खिसा कापून शोषण करीत होते या काळात मंत्र्यांनी मात्र खाजगी रुग्णालयात उपचार घेतले आणि त्यांचे बिल सरकारी तिजोरीतून भरण्यात आले. माहितीच्या अधिकारात या बाबत मिळालेली माहिती धवकादायक आहे तब्बल 18 मंत्र्यांनी आपले उपचारांची बिले सरकारी तिजोरीतून दिली यात आरोग्य मंत्री राजेश टोपे आघाडीवर होते.टोपे यांचे 34लाख 40930,ऊर्जा मंत्री राऊत 17,13,879,ग्रामविकास मंत्री मुश्रीफ 14,65,604,अब्दुल सत्तार12,56748,आव्हाड 11लाख 56278,भुजबळ 9लाख3401,केदार 8लाख 71890,सुभाष देसाई 6लाख 97293,अनिल परब 6लाख79606 जवळपास 1कोटी 40 लाखांची ही खाजगी रुग्णालयांची बिले या मंत्र्यांनी सरकारी तिजोरीतून भरली आहेत .