हीट अँड रन पुणे पोलिसांचे दिवस भरले – कारवाईसाठी फडणवीसांवर मोठा दबाव – आरोपी अल्पवयीन नसल्याचे उघडकीस
पुणे/हीट अँड रन प्रकरणात तरुण तरुणीचा जीव गेल्यानंतरही पुणे पोलिसांनी बिल्डर विशाल अग्रवाल बरोबर सेटिंग करून त्याच्या मुलाला वाचवण्याचा जो केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. त्या विरुद्ध पुण्यात संतापाची लाट उसळली असून, पुणेकरांचे रौद्ररूप पाहून आज अचानक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण माहिती समजून घेतली. त्याचबरोबर आरोपीला जामीन मंजूर करताना ज्या बालिश तरतुदी टाकल्या आहेत, त्याबद्दल ही फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केले असून ,बाल हक्क न्यायालयाच्या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांची जर संशयास्पद भूमिका असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल .असे संकेतच देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत .त्यामुळे आरोपीला वाचवण्याचे पुणे पोलिसांचे प्रयत्न त्यांच्या अंगाशी येणार आहेत .या प्रकरणात पुणे पोलिसांवर फार मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री एका भरधाव कारणे दुचाकीवर बसलेल्या तरुण-तरुणीला उडवल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे कार चालवणारा तरुण हा विशाल अगरवाल बिल्डर नावाच्या पुण्यातल्या मोठ्या बिल्डरचा मुलगा आहे .त्यामुळे पुणे पोलीसानी या प्रकरणात आरोपीची बाजू घेऊन त्याला चांगली ट्रीटमेंट दिली. तसेच त्याच्यावर अत्यंत साधी कलमे लावून त्याला तात्काळ जामीन कसा मिळेल याची तरतूद केली. यामध्ये फार मोठी आर्थिक सेटिंग झाल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धनगेकर यांनी केला आहे. आज पुण्यात आलेल्या गृहमंत्री फडणवीस यांना यासंबंधी पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले की सदर आरोपी हा अल्पवयीन नसून सतरा वर्ष आठ महिन्याचा आहे. असे असताना त्याच्यावर अल्पवयीन म्हणून कारवाई कशी काय होऊ शकते. आम्ही याबाबत न्यायालयाला विनंती करून तो सज्ञान असल्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करा असे सांगणार आहोत. दरम्यान अपघात झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी तो आरोपी दारू प्यायला होता. अशा वेळी त्याची मेडिकल करणे अत्यंत आवश्यक होते. पण पुणे पोलीसानी आरोपीच्या बापाकडून पैसे घेतलेले असल्याने मेडिकल करण्यास टाळाटाळ केली. असा आरोप पुणे पोलिसांवर केला जात आहे .आणि या सगळ्या प्रकरणाची आता अत्यंत बारकाईने चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात पुणे पोलिसांनाही आरोपी केले जाऊ शकते. तर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मात्र पोलिसांवरचे आरोप फेटाळले आहेत .त्यांनी सांगितले आम्ही आरोपीला कुठल्याही प्रकारची रॉयल ट्रीटमेंट दिलेली नाही .त्याचबरोबर आरोपीची ब्लड टेस्ट झाली असून त्याचा अहवाल लवकरच येईल. त्यामुळे आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. जे लोक तसा आरोप करीत आहे त्याने कायदेशीर बाबींचा अभ्यास करून माझ्यासमोर चर्चेला बसावं असे आव्हान ही अमितेश कुमार यांनी केलेले आहे. मात्र ते काही जरी असले तरी या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्यामुळे, संपूर्ण पुणे शहर पोलिसांच्या विरोधात उभे राहिलेले आहे