ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

ही तर धोक्याची घंटी

राज्यसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे मते फोडून भाजापने तिसरा उमेदवार निवडून आणला अगदी तशाच प्रकारे विधान परिषदेच्या निवडणुकीतही राजकीय खेळी खेळून भाजपने त्यांच्याकडे पुरेशी मते नसतानाही पाचवा उमेदवार निवडून आणला.त्यामुळे महाविलास आघाडीतले शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षात समन्वय नाही त्याच बरोबर महाविकास आघाडीच्या नेतृत्वात आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्याची क्षमता नाही सते मध्ये असताना जर हे लोक आपले k8nva आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षणं सांभाळू शकत नाहीत तर उद्या सत्ता गेल्यावर यांचे काय होईल तेच काळात नाही मात्र अपक्ष काय किंवा आपल्या पक्षातील आमदार काय मोक्याच्या क्षणी का दहा देतात याचा महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी कधी विचारच केला नाही.केवळ आपल्या पक्षातील आमदारांना आणि अपक्षणा सुधा गृहीत धरले.त्यामुळे जे आघाडीवर नाराज होते त्यांनी मोका साधून चोका मारला त्यामुळे त्यांना दोष देण्यात अर्थ नाही.आज महाविकास आघाडी अडीच वर्ष सते मध्ये आहे यावेळी त्यांना बहुजन विकास आघाडी समाजवादी पक्ष कम्युनिस्ट पक्ष यासारख्या छोट्या पक्षांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता मग जे लोक तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देतात . त्यांच्यासाठी काही करण्याची किंवा त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची तुमची जबाबदारी नाही का ? समाजवादी पक्षाचे नेते आबू आझमी यांनी अनेक वेळा मिडियशी बोलताना सांगितले की मुख्यमंत्री आमचा फोन घेत नाहीत .आम्हाला भेटायला वेळ देत नाहीत तीच तक्रार अपक्षांची होती . मग बिनशर्त पाठींबा देणाऱ्यांचा फोन घ्यायलाही जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर त्यांनी निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला का पाठिंबा द्यावा त्यांच्या उमेदवारांना का मतदान करावे याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे.भाजपला सतेच्या बाहेर ठेवण्यासाठी मजबुरी खातिर समाजवादी एम आय एम हे सरकार सोबत होते . पण भाजपला सतेच्या बाहेर ठेवण्याची जबाबदारी फक्त त्यांचीच आहे का? याबाबत सता उपभोगणाऱ्या नेत्यांची काहीच जबाबदारी नाही का? शरद पवार यांच्या सारख्या जाणत्या राजाला तरी या गोष्टी कळायला हव्या होत्या . पण राज्यसभेत ठेच लागली तरी महा विकास आघाडीचे नेते सावध झाले नाहीत आणि त्याचे परिणाम त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत भोगावे लागले .

विधान परिषदेच्या निवडणुकीत महा विकास आघाडीची 20 मते फुटली ही धोक्याची घंटा आहे कारण भाजपने जर आज एवढे आमदार फोडले तर उद्या सरकारवर अविश्वास ठराव आणायला त्यांना वेळ लागणार नाही भाजपचा हाच कावा महाविकस आघाडीच्या लक्षात कसा येत नाही आणि लक्षात आला असेल तर सरकार वाचवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न का केले जात नाहीत .राहता राहिला प्रश्न छोट्या पक्षांचा तर छोट्या पक्षांना तुम्ही का गृहीत धरता बहुजन विकास आघाडी सारख्या छोट्या पक्षांना निवडणूक लढण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याची मोठ्या पक्षांना कल्पना नाही . उलट हे मोठे पक्षच निवडणुकीत छोट्या पक्षांना दाबण्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात पण स्थानिक जनतेसाठी त्या छोट्या पक्षांनी ग्राउंड लेव्हलवर जी काम केलेली असतात त्यामुळे तिथली जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते .महाविकास आघाडी किंवा भाजप सारख्या मोठ्या पक्षातील नेत्यांना विरार कुठे आहे तेही कदाचित ठाऊक नसेल जीवदानी मातेच्या दर्शनाला सुधा जे कधी गेले नाहीत ते राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूरच्या पाय पडायला विरार मध्ये जात होते म्हणजे तहान लागेल तेंव्हा विहीर खोदयची अशातला हा प्रकार आहे त्यामुळे अशा छोट्या पक्षांनी महा विकास आघाडीला का मतदान करायचे या सगळ्या ध्यानात ठेवाव्यात .

error: Content is protected !!