ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

दादरमध्ये पालिका आणि पोलिस याच्या आर्शिवादाने परप्रातिंय फेरीवाल्याची दादागिरी


मुंबई (किसन जाधव) फेरीवाले आणि पालिका अधिकारी यांच्यात साटे लोटे असल्यामुळेच अर्ध्या मुंबईच्या फुटपाथ आणि रस्त्यांवर फेरीवाल्यांनी कब्जा केलाय पण पालिका त्यांचे काहीच करू शकत नाही कारण पालिका वास्तविक नियमानुसार कोणत्याही स्टॉल मध्ये गुटका व खाद्य पदार्थ बनवता ही येत नाहीत आणि विकतही येत नाहीत तरी सुधा दादर सेनापती बापट मार्गावर फूल बाजार येथील मनिष मार्केटसमोरच रस्त्याच्या पलीकडे गुटका विक्री आणि खाद्य पदार्थांचे स्टॉल सुरू आहेत लागून अनेक स्टॉल मधून बेकायदेशीर रित्या वडापाव पासून चायनीज पर्यंत सगळे खाद्य पदार्थ विकले जातात. विशेष म्हणजे तेलात तळलेले पदार्थ खूपच आरोग्याला हानिकारक आहेत कारण पदार्थ तळण्यासाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा पुन्हा दुसरे पदार्थ टाळण्यासाठी वापरले जाते आणि हेच पदार्थ पुढे ग्राहकांना विकले जातात त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे शिवाय या ठिकाणी जनतेचा रस्ता अडविल्यामुळे जनतेला विशेषता लेटीज यांना मार्गक्रमण करताना स्टाल वाल्यांकडून आचकटविकट शब्द आणि नजरा ऐकायला मिळतात.त्यामळे परिसरातील लेडीज सतप्त झाल्या आहेत. पण पालिकेच्या आरोग्य विभागाचे आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी या बेकायदेपणावर कोणतीही कारवाई न करत हप्तेखोरी करत बसलेत काय? असा प्रश्‍न जनतेचा आहे.
केवळ इथेच नाही तर फूल मार्केट,व्रिज खाली दादर वेस्टन स्टेशन आसपासचा सर्व परिसर या फेरीवाल्यांनी व्यापला आहे. मागील एक वर्षात प्रंचड परप्रांतिय फेरीवाले वाढलेत. यांना माल आणि संरश्रण देणारी टोळी कार्यरत आहे. महिन्याचे भाडे या टोळीला दिले जाते ,त्यातुने हे रेकेट पोसले जाते. पालिकेच्या जी-उत्तर वार्ड मधील अतिक्रमण,अनुश्रापण ,आरोग्य अधिकार्‍यांना फेरीवाले आणि बेकायदा स्टाल त्यांच्याकडून मोठा हप्ता मिळतो त्यामुळे फेरीवाले वाढलेत आणि बॉस बनलेत आणि इकडे कामधांद्याला येणारे बिचारे मुंबई कर या फेरीवाल्यांच्या दहशतीला घाबरून आहेत. कुणी विचारले अतिक्रमणाबद्दल विचारले तर फेरीवाले मारायला उठतात आणि बोलतात तुमको जो करणा है ंवो करो हमारा कुछ नही करपावोगे असे धमकीचे बोल नागरीकांना सूनावतात. मग लोकांनी करायचे तरी काय पण ज्या दिवशी मुंबईकर जनतेची सटकेल त्यवेळी जनतेला दोष देऊ नका>

error: Content is protected !!