ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

विधानसभा बरखास्त करण्याच्या हालचालीने शिवसेना बंडखोरांचे धाबे दणाणले


उधव ठाकरे राजीनामा देण्यास तयार
मुंबई/ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंना हाताशी धरून भाजपने जे प्रयत्न सुरू केले आहेत ते आता त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे कारण उद्धव ठाकरे यांनी विधानसभा बरखास्त करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्याने शिवसेना बंडखोर आणि भाजपचे सुधा धाबे दणाणले आहेत .
कालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा होता कारण सेनेतील बंडखोरी नंतर काल प्रथमच मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेशी फेसबुक लाईव्ह वरून संवाद साधला ते म्हणाले जर शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना माझा राजीनामा हवा असेल तर मी आताही राजीनामा द्यायला तयार आहे.त्यांनी इथे मुंबईत जरी सांगितले असते तरी मी राजीनामा दिला असता त्यासाठी सुरतला जायची काय गरज होती . काही लोक म्हणतात की ही बाळासाहेबांची शिवसेना नाही पण याच शिवसेनेने 63 आमदार निवडून आणले हे कसे विसरता माझी काँग्रेस नेते कमलनाथ सोनिया गांधी यांनी विचारपूस केली . पण आमच्या लोकांनीच अशा प्रकारे वेदना दिल्या आणि कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ ठरले अशी खंत व्यक्त केली दरम्यान काल मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटची बैठक घेतली तसेच शरद अवरांचीही भेट घेऊन चर्चा केली . सध्या सेनेचे बंडखोर गोहतीत आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भारत गोगावले यांची शिवसेनेच्या प्रतोद पदी नेमणूक केली तसेच मला गटनेते पदावरून हटवणे बेकायदेशीर आहे असे सांगितले .

error: Content is protected !!