डरपोक भाईजान – बिष्णोई यांच्या धमकी नंतर शस्त्र परवान्यासाठी सलमान खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट
मुंबई/ पंजाबी गायक मुसेवला याची हत्या घडवून आणणारा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिशंनोई यांनी सलमान खान आणि त्याच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली . या धमकीमुळे भाईजान इतका घाबरला आहे की त्याने पोलिसांकडे शस्त्र परवान्याची मागणी केली आहे त्यासाठी त्याने काल पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली .
सिनेमात अनेक गुंडांना लोळवणारा भाईजान सलमान खान खाजगी जीवनात मात्र डरपोक निघालाय मुसेवाला यांच्या हत्येनंतर 5 जून रोजी सलमान खान याला एक पत्र पाठवण्यात आले होते यात तुम्हारा मुसावला कर दुंगा अशी सलमान व त्याचे वडील सलीम खान यांना धमकी देण्यात आली होती या बाबतची माहिती मिळताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली त्याच्या बा न्द्रा येथील गलेक्सी अपार्टमेंट बाहेर क्राइम ब्रांच ची एक टीम तैनात करण्यात आली . दरम्यान मुसावाला यांच्या वडिलांनाही धमकीचे पत्र आले त्यामुळे ते गाव सोडून पाळले .सलमान खान याला लॉरेन्स बिश्र्नोयी याचा शूटर विक्रम बराड याने धमकीचे पत्र लिह ले होते अशी माहिती चौकशीत उघडकीस आल्याने भाईजान चांगलाच घाबरला आहे आणि याच भीतीतून त्याने शास्त्र परवान्यासाठी पोलिसांकडे अर्ज केलाय तसेच काल पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्याच्याशी 20 मिनिटे चर्चा केली .