धन्यवाद ! जनता आभारी आहे!!
कोरोनाचं संकट हे जगावर आलेले एक मोठे संकट होते आणि तब्बल दीड वर्षात या संकटाने जगातील अनेक कुटुंबांना उध्वस्त करून टाकले.कोरोनाने मेलेल्यांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी एक कोटींच्या आसपास लोक कोरोणाने मृत्युमुखी पडले होते.पण सर्वात जर वाईट काय असेल तर कोरोणा काळात सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे घराचा अक्षरशः तुरुंग झाला होता त्यामुळे लोकांना सणवार सुधा साजरे करता आले नाहीत पण आता कोरीनाचा प्रादुर्भाव खूपच कमी झाल्याने लोकांनी मोकळा श्वास घेतला आहे.लोक घराबाहेर पडून काम धंद्याला जात आहेत करोना विस्कळीत झालेले जन जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आणि म्हणूनच या वर्षी महाराष्ट्र सरकारने सणा वर घातलेले सर्व निर्बंध हतबल आहेत .त्यामुळे या वर्षी दही हंडी गणेशोत्सव,नवरात्रोत्सव या हिंदूंच्या मोठ्या उत्स्व व मुस्लिम आणि इतर धर्मियांचे सण सुधा उत्साहात साजरे होणार आहेत. या सणांची तयारी सुधा सुरू झाली आहे.गोविंदा पथकांच्या हंडी फोडण्याचा प्रॅक्टिस सूरू झाल्यात.गणेश शाळांमध्ये गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम वेगाने सुरू झाले आहेत . सार्वजनिक गणेशोत्सवातील मुर्त्यांवर जी उंचीची मर्यादा घालण्यात आली होती ती या वर्षी हटवण्यात आल्याने या वर्षी सर्व सार्वजनिक गणेशोत्सवात मोठ्या आणि आकर्षक गणेशमूर्ती बघायला मिळतील तर वर्षांनी यंदा लालबागचा राजा सुधा त्याच्या पूर्वीच्या भव्य दिव्य स्वरूपात गणेश भक्तांना दिसणार आहे.गणेशोत्सव प्रमाणे नवरात्रोत्सव सुधा धूमधडाक्यात साजरा होणार आहे.विशेष म्हणजे नव्या सरकारने या वर्षी उत्सव मंडळांना काही सवलती सुधा दिल्या आहेत . ज्यामध्ये सर्व परवानग्या साठी एक खिडकी योजना वेगवेगळ्या परवांग्यांसाठी लागणाऱ्या शुल्कात कपात यासारख्या सवलतींमुळे उत्सव मंडळे खुश आहेत.सरकार अजून पूर्णपणे अस्तित्वात आलेले नसतानाही येवढे सगळे करण्यामागे अर्थात सत्ताधारी पक्षांचा काहीतरी हेतू आहेच .
कारण शिंदे गट आणि भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत त्यामुळे हिंदूंना खुश करण्यासाठी सणा वरील निर्बंध हटवणे गरजेचे होते कारण 14 महापालिका आणि 94 नगर परिषदांच्या निवडणुका तोंडावर आहेत .त्यामुळे हिंदूंची एक गठ्ठा मते मिळवण्यासाठी हिंदूंना खुश करणे गरजेचे होते ,ते त्यांनी केले.पण उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेवर असते तर एवढी सूट आणि सवलत मिळाली नसती कारण उद्वव ठाकरे डॉक्टरांच्या टास्क फोर्सचा सल्ल्यानुसार सर्व निर्णय घ्यायचे .आणि सध्या करोना आटोक्यात आला तरी पूर्णपणे गेलेला नाही अजूनही देशात कोरोनाचे जवळपास दीड लाख रुग्ण आहेत आणि मुंबईत सुधा कोरोणाचे रूग्ण सोडत आहेत या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने सना वरील निर्बंध हटवण्याचा धोका पत्करला नसता पण फडणवीस आणि शिंदे याना हिंदुत्व सिद्ध करून दाखवायचे आहे . त्यामुळेच त्यांनी सणा वरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.अर्थात यात कितीही राजकारण असेल तरी गेल्या दीड वर्षांपासून सण साजरे करायला न मिळाल्याने नाराज असलेल्या जनतेमध्ये नव्या सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केला जास्त आहे .