ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मागाठाणेत ठाकरे गटाला खिंडार – २ माजी नगरसेवक शिंदे गटात

मुंबई – ठाकरे गटातील माजी नगरसेविका रिध्दी भास्कर खुरसंगे, त्याचे पती माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांच्यासह माजी नगरसेविका गिता सिंघन आणि त्यांचे पती तथा ठाकरे गटातील पदाधिकारी संजय सिंघन आदींसह कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशावेळी मागाठाणे विधानसभा मतदार संघातील शिवसेना पक्षाचे आमदार प्रकाश सुर्वे उपस्थित राहणार आहेत.
मागा ठाणे विधानसभा मतदार संघ हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदार संघातील ठाकरे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे हे २०१९ ला दुसऱ्यांदा निवडून आले. मात्र; शिवसेनेच्या फुटीनंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात २०२२ ला गेले. तेव्हापासून मागाठाण्यातील ठाकरे गटाचे ८ नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक आमदार सुर्वे यांच्यासोबत शिंदे गटात गेले नव्हते. मात्र काही महिन्यापुर्वी माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता. आता आगामी विधानसभा निवडणूक आणि त्यापाठोपाठ येणारी मुंबई महापालिका निवडणूकीची रणनितीसमोर ठेवून मागाठाण्यात ठाकरे गटाला राजकिय धक्के बसत आहेत. त्यामुळे मागाठाणे विधानसभा मतदार संघात आठ पैकी तीन माजी नगरसेवक हे शिंदे गटात गेले आहेत

error: Content is protected !!