नांदगांव ग्रामपंचायत हद्दीतील भोपळी येथील ग्रामस्थ पुन्हा शिवसेनेत; आम. महेंद्र थोरवे यांनी केले पुन्हा सेनेत स्वागत!
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील नांदगाव भोपळी येथिल ग्रामस्थांनी नुकताच काही दिवसांपूर्वीच सेनेतुन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र काल१९ सप्टेंबर रोजी भोपळी येथील या ग्रामस्थांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. मात्र पुन्हा हे सर्व कार्यकर्ते शिवसेनेत परतले आहेत. दरम्यान या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करतेवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने खोटे आश्वासन व दिशाभूल करून पक्ष प्रवेश या कार्यकर्त्यांचा घेण्यात आला होता. अशी माहीती सेनेचे पदाधिकारी तथा कर्जतचे नगरसेवक संकेत भासे यांनी दिली.
आज दिनांक २० सप्टेंबर रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा भगव्या झेंड्याखाली या सर्व कार्यकर्त्यांनी घरवापसी केली असून भोपळी येथील राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेश्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. या प्रसंगी तालुका संघटक शिवराम बदे, मा उपसभापती मनोहर थोरवे, उपतालुका प्रमुख भरत डोंगरे, विभाग प्रमुख रवी ऐनकर, रवी फोपे, मा सरपंच नागेश साबळे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान प्रवेशकरतेवेळी आमदार महोदयांच्या हस्ते स्थानिक आमदार विकास निधी सन २०२१-२२ निधी अंतर्गत भोपळे वाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे करिता निधीचे पत्र ग्रामस्थांकडे सुपूर्त करण्यात आले असल्साची माहीतीही ग्रामस्थांकडुन देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा प्रवेश कार्यक्रम फेल झाल्याची चर्चा आता येथे रंगात आली आहे.
Photo caption;-
कर्जत तालुक्यांतील भोपळी येथिल ग्रामस्थांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र हे सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा घरवापसी करुन स्वग्रुही शिवसेनेत परतले आहेत, या सर्व कार्यकर्त्यांचे पुन्हा सेनेत स्वागत करताना कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, माजी पंचायत समिती उपसभापती मनोहर थोरवे, संघटक शिवराम बदे, युवा नेते नगरसेवक संकेत भासे व अन्य पदाधिकारी तसेच प्रवेशकर्ते छायाचित्रांत दिसत आहेत.