सत्ताधारी शिवसेना पालिका अधिकारी आणि ठेकेदार या त्रिकुटाच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य
मुंबई/मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरून दिवसेंदिवस वादविवाद वाढतच चालले आहेत आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपसह सतेत भागीदार असलेल्या काँग्रेसनेही रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर सत्ताधारी शिवसेनेवर टीकेचे आसूड ओढले आहेत असे मुंबईचे माजी उप महापौर बाबूभाई भवान ji यांनी म्हटले आहे.बाबूभाई पालिकेला उघड आव्हान दिले आहे की कुठे कुठे खड्डे भरलेत ते दाखवा.मुंबईच्या रस्त्यांवर अजूनही २५ हजारहून अधिक खड्डे आहेत .मुंबईचे खड्डे भरण्यासाठी पालिकेने ४८हजार कोटींची तरतूद केली होती तीही आता संपलीय.आणि आता आणखी खड्डे भरण्यासाठी अतिरिक्त बजेटचा व्यवस्था करण्याची तयारी सुरू आहे.बाबूभाई पुढे म्हटले आहे की खड्ड्यांच्या नावावर आतापर्यंत हजारो कोटी बरबाद करण्यात आले आहेत.आणि पालिका अधिकारी व सताधरी शिवसेनेने मिलीभगत करून हा भ्रष्टाचार केलेला आहे बाबूभाई सांगितले की विभिन्न विकास कामांसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीवर ३५० कोटींचा खर्च करण्यात आला होता तरीही रस्त्यांची अवस्था खराब आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील ३४हजार खड्डे आतापर्यंत भरण्यात आले आहेत पण खड्डे भरण्याच्या नावाखाली केवळ थूकपट्टी लावण्यात आली आहे.खड्डे भरण्या ऐवजी ठेकेदारांनी आपले खिसे भरले आहेत. एक खड्डा भरल्यावर त्याच ठिकाणी दुसरा त्याच्या पेक्षाही मोठा खड्डा तयार होतो अशी स्थिती आहे कारण खड्डे भरण्यासाठी निकृष्ट आणि हलक्या दर्जाचे मटेरियल वापरले जाते असा आरोप बाबूभाई केला आहे.खड्डे भरताना नियमांचे पालन केले जात नाही.पालिकेचे अधिकारी निरीक्षण करीत नसल्यामुळे पालिकेची तिजोरी खाली होत आहे आणि रस्त्यावर आणखी मोठमोठे खड्डे पडत आहेत.दरवर्षी रस्त्यांच्या कामावर कोट्यावधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची अवस्था पूर्वी होती तशीच आहे पालिका यावर कायमस्वरूपी उपाययोजना का करीत नाही?रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचार हा दरवर्षीचा एक मोठा फ्रॉड आहे .म्हणूनच पालिका आयुक्तांनी स्वतः या खड्ड्यांचे निरीक्षण करावे आणि दरवर्षी होणारा हा भ्रष्टाचार थांबवावा अशी मागणी बाबूभाई भवानजी यांनी केली आहे ते पुढे म्हणाले की दरवर्षी पावसाळ्यात आणि गणेशोत्सवात मुंबईकरांना रस्त्यावरच्या खड्ड्यांचा सामना करावा लागतो पालिका आयुक्तांनी मुंबई शहर आणि उपनगरातील खड्ड्यांचे ऑडिट करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी आणि दोषी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करावे.बाबूभाई यांनी असेही म्हटले आहे की वेगवेगळ्या कामांसाठी रस्त्याच्या किनारी झालेले खोदकाम आणि ती जागा भरून पूर्ववत करणे यासाठी ३५० कोटींचा ठेका आहे . पण त्यात पारदर्शकता नाही हलक्या दर्जाचे काम केले जाते त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो.याबाबत अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आता संपर्क होऊ शकला नाही .पालिकेने मुंबईला खड्डे मुक्त करण्यासाठी ६ मिटर पेक्षा अधिक रुंद रस्त्यांना सिमेंटकाँक्रीट करण्याचा निर्णय घेतला आहे . पुढील पाच वर्षांत मुंबईच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे