ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण माहिती -करोना बळींच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत

दिल्ली/ कोरोणाने ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा दुर्दैवी व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकार मदत करणार का ? यावर गेल्या वर्षभरापासून सर्वच पातळीवर विचारमंथन सुरू होते अखेर केंद्र सरकारने कोरोनाणे मृत्यू पावल्याचा कुटुंबीयांना ५० हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून काल सर्वोच्च न्यायालयात तशी सरकारच्या वतीने माहिती देण्यात आली त्यामुळे ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती करोनाच्या आजाराने गमावल्या आहेत अशा कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे .
गेल्या दीड वर्षापासून देशात करोनाचे संकट आहे त्यामुळे मार्च२०२० मध्ये सरकारने लॉक डाऊन केला होता तरीही रुग्ण आटोक्यात येत नव्हती उलट वादात चालली होती मात्र नोव्हेंबर नंतर करोताचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताच अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली .दरम्यान कोरोनने आतापर्यंत ४लाख४५हजार ७६८ लोकांचा बळी घेतला आहे त्यामुळे करोनाला साथीत ज्या मुलांचे आई वडील दोघेही मृत्यमुखी पडलेत अशा अनाथ मुलांची जबाबदारी यापूर्वीच राज्य सरकारांनी घेतली आहे मात्र क मृत्युमुखी पडलेल्या मोठी आर्थिक मदत मिळावी ही मागणी मान्य केली जात नव्हती त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यात करोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती पण केंद्राने याबाबत असमर्थता दर्शवित ५० हजार देण्याची तयारी दर्शवली असून तसे प्रतिज्ञा पात्र दाखल केले आहे .त्यामुळे आता करोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आपती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून ५० हजारांची मदत दिली जाईल

error: Content is protected !!