मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय – सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई – ज्या महापालिकांची मुदत संपलेली आहे परंतु कोरोंनामुळे निवडणूक लांबणीवर पडलीय अशा महाराष्ट्रातील मुंबई वगळता आणि महापालिकेच्या निवडणुकीत त्रिसदस्यीय प्रभाग असेल तर पालिका आणि नगर परिषदांमध्ये द्विसदस्यीय प्रभाग असेल मात्र नगर पंचायर्तीमद्धे एक वार्ड निवडणुका होतील असा महत्वपूर्ण निर्णय काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला दरम्यान मुंबईत मात्र 1957 च्या कायदा नुसार सिंगल वार्ड पद्धत कायम राहणार आहे आणि तिचा फयदा अर्थातच शिवसेनेला होणार आहे राज्यात मुदत संपलेल्या आणि येत्या फेब्रुवारी पर्यन्त मुदत संपणार्या महापालिका निवडणूक प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राजी निवडणूक आयोगाने दिले होते ही रचना सरकारच्या 31 डिसेंबर 2019 च्या कायद्यानुसार एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होईल आणि त्याच पद्धतीने प्रभाग रचना करण्याची सूचना आयोगाने दिल्या होत्या मात्र त्याला सरकारने विरोध दर्शवीत सर्वच महापालिकांमध्ये एक सदस्यीय प्रभाग नसेल आणि त्यात काही बदल होतील असे अजितदादा पवार यांनी संगितले होते त्यानुसार काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली पुणे पिंपरी चिंचवड,सोलापूर, कोल्हापूर यासह काही महापालिकांमध्ये दोन सदस्यीय पद्धत राहावी असा काही नेत्यांचा आग्रह होता पण कालच्या बैठकीत मुंबई वगळून इतर महापालिकांमध्ये त्रिसदस्यीय प्रभाग असावा यावर शिक्कामोर्तब झाले आहे