ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

एस टी कामगारांची क्रूर थट्टा


दिवाळी तोंडावर आली आहे.सरकारी आणि खाजगी उपक्रमातील कामगारांचे बोनस झालेत. त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होणार आहे पण अत्यंत कठीण परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या एस टी कामगारांना केवळ 5 हजार रुपये बोनस जाहीर करून त्यांची क्रूर थट्टा करण्यात आली आहे . .अगोदर करोन आणि नंतर विलिनीकरण चां मागणीसाठी वर्षभर झालेला संप यामुळे एस टी कामगार आर्थिक दृष्ट्या देशोधडीला लागला होता . त्यामुळे आता कुठे त्याची दिवाळी गोड होईल असे वाटलेले असतानाच सरकारने केवळ 5 हजार रुपयात त्यांची बोळवण केली आहे .एकीकडे पगार वेळेवर मिळत नाही तर दुसरीकडे तुटपुंजा बोनस! त्या बिचाऱ्या कामगारांनी कसे जगायचे जे सरकारी कर्मचारी त्यांच्या कार्यालयात 8 तासा मधले 4 तास सुधा व्यवस्थित भरत नाहीत त्यांना लाख लाख रुपये बोनस आणि ज्यांनी करोना सारख्या कठीण काळात सुधा जीवाची पर्वा न करता सेवा बजावली त्यांना अवघा 5 हजार रुपये बोनस! आता कुठे गेले ते एस ती कामगारांचे तारणहार? सदा खोत आणि गोपी पडळकर आता गप्प का? सरकार त्यांचे आहे मग आता त्यांच्या तोंडाला कुलूप का ? एक गोष्ट खरी की कोण कुणाचे नाही गरिबांनी फक्त मर मर राबायचे आणि सरकारची सेवा करायची निवडणुकीत पुढाऱ्यांच्या मागे झिंदाबाद मुर्दाबाद म्हणत झेंडे नाचवत फिरायचे आणि सणवार पुढाऱ्यांनी साजरे करायचे दिवाळी सारख्या सनात त्यांच्या पोराबळणी चांगले कपडे घालून गळ्यात चैन अंगठ्या घालून मिरवायचे आणि गरीब कामगारांच्या मुलांनी त्यांच्या तोंडाकडे बघत अश्रू गळीत दिवाळी साजरी करायची हेच सध्या सुरू आहे आणि आमच्या गरीब एस टी कामगारांवर आज तिचं पाळी आली आहे

आणि म्हणूनच त्यांची सरकारी सेवेत विलिनीकरण करण्याची मागणी होती आणि ती काही प्रमाणात योग्यच होतो.सरकार सांगते की एस टी महामंडळ तोट्यात आहे.पण हे महामंडळ कामगारांनी तोट्यात घालवले का ? एस टी चां चालक वाहक तांत्रिक कर्मचारी जीव तोडून काम करीत आहेत.तरीही एस टी तोट्यात कशी? याची कारणे कधी सरकारने शोधली आहेत का ? एस टी तोट्यात जाण्यास एस टी महामंडळात बसलेले लबाड राजकारणी कारणीभूत आहेत.नव्या नव्या गाड्या भंगारात काढायच्या आणि त्यानंतर आणखी नव्या गाड्या घेण्यासाठी कर्ज काढून एस टी वर कर्जाचा डोंगर वाढवायचा.एस टी चे सुटे भाग आयात करताना त्यात कमिशन काढायचे 50 लाखांचे मटेरियल खरेदी केले तर त्याची 1 कोटी किंमत सांगायची.एस टी चे कुठले मार्ग फायद्यात आहेत कुठले मार्ग तोट्यात आहेत याचा सर्व्हे न करता सरसकट सर्व मार्गावर गाड्या चालवायच्या त्या रिकाम्या धावल्या तरी चालतील पण त्याचा खर्च दाखवता आला पाहिजे आणि त्यातून आपले कमिशन निघाले पाहिजे .ही एस ती महामंडळातील नेत्यांची भूमिका आहे आणि त्यांच्या याच भूमिकेमुळे एस टी सतत तोट्यात जात आहे.आणि त्यांच्या या पापाची शिक्षा बिचारे गरीब एस टी कामगार भोगत आहेत.सरकारने सर्वात प्रथम एस टी महामंडळात जे कुणी लबाड बसले आहेत त्यांची चौकशी करावी आणि एस टी महामंडळ कामगारांच्या ताब्यात द्यावे त्यावर समाजीक संघटनांचे दोन प्रतिनिधी घ्यावेत पण एस टी महामंडळावर कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढारी लोकांना घेऊ नये कारण याच लोकांनी एस टी कामगारांची वाट लावली आहे असा उघड आरोप एस टी कामगार करीत आहेत ज्या सरकारने एस टी कामगारांना 5 हजार बोनस जाहीर केलंय त्यांनी 5 हजारात दिवाळी साजरी करून दाखवावी.ज्या राजकीय पुढाऱ्यांनी घरात लग्नाची बायको असताना बाहेर दुसऱ्या बायका ठेवल्या आहेत त्यांना दिवाळीला 10/ 10 हजाराच्या पैठणी घेतात आणि आमच्या गरीब कामगारांना 5 हजारात दिवाळी साजरी करायला सांगताय हा कुठला न्याय असा सवाल संतप्त एस टी कामगार करतोय .

error: Content is protected !!