विधानसभा निवडणुकीतील पहिली मोठी कारवाई सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या गाडीतून पाच कोटींची रोकड जप्त
पुणे/निवडणुकीत मतदारांना मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केले जाते ही गोष्ट आता काही नवीन नाही महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीत ही मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले जाणार अशी आतापासूनच चर्चा होती त्या चर्चेला आता कुस्ती मिळाली आहे कारण पुण्यातील खेड/शिवापुर मार्गावर एका बड्या नेत्याच्या गाडीतून पोलिसांनी पाच कोटींची रक्कम जप्त केलेली आहे हा नेता सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याचे समजते ही एवढी मोठी रक्कम तो कुणासाठी घेऊन जात होता या आता चौकशी निश्चितपणे बाहेर येईल पण त्याचबरोबर जर हा आमदार आता निवडणुकीला उभा राहिला असेल तर निवडणूक आयोग त्याच्यावर कठोर ॲक्शन घेण्याची शक्यता आहे निवडणुकीत यापूर्वीही महाराष्ट्रात पैसे वाटप केल्याच्या आणि पैसे वाटपासाठी लिहिली जात असलेली रक्कम जप्त केल्याच्या घटना घडलेल्या आहेत परंतु या विधानसभा निवडणुकीतील ही पहिलीच घटना आहे पाच कोटीची ही रक्कम कशी पाहता खूपच मोठी आहे त्यामुळे निवडणूक आयोग याची निश्चितपणे दखल घेण्याची शक्यता आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेचे कठोरपणे पालन व्हावे यासाठी निवडणूक आयोग आणि पोलिसांची काही पदके तयार करण्यात आली आहे या पथकांची सर्वत्र बारीक नजर आहे अशाच एका पथकाने ही पाच कोटीची रक्कम एका कारमधून जप्त केली आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ही रक्कम सत्ताधारी पक्षाच्या आमदाराची असल्याचे सांगितले आहे त्यामुळे आता याची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे