ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल आता ३५ नवे तर वीस गुणाला काठावर पास


मुंबई/राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे यापूर्वी 35 किंवा त्याच्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना गणित आणि सायन्स या विषयात फेल केले जायचे किंवा पुढे त्यांना प्रवेश दिला जात नसेल परंतु आता मात्र ही गुणमर्यादा वीस गुणांची केलेली आहे त्यामुळे वीस गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण ठरले जाईल तसेच त्याला पुढे अकरावीच्या वर्गात प्रवेश घेताना ऍडमिशन घेताना कोणतीही अडचण येणार नाही बोर्डाच्या या निर्णयाचे काही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे तर काहीही मात्र याला विरोध केला आहे अशा प्रकारच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये ची स्पर्धात्मक गुणवत्ता आहे ती कुठेतरी कमी होऊ शकते असे म्हटले जात आहे त्यामुळे बोर्डाचा हा निर्णय काहीसा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षाच्या शालेय अभ्यासक्रमापासून केली जाण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!