ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस टी कामगारांच्या संपावर न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी — आज काय होणार?


मुंबई/ गेल्या तीन आठवड्यां पासून सुरू असलेल्या एस टी कामगारांच्या संपात आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे कारण आज न्यायालयात या संपावर महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.त्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालयात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

विलिनीकरण मुद्द्यावर असून बसलेल्या एस टी कामगारांना सरकार आणि मुंबई उच्च न्यायालयाने वारंवार कामावर हजर राहण्याचे आदेश देवून सुधा ते कामावर हजार झालेले नाहीत. सरकारने विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या आदेशाने एक समिती नेमून तिला बारा आठवड्यात अहवाल द्यायला सांगितला आहे .पण तोवर कामगारांनी कामावर हजर व्हावे अशी न्यायालयाची भूमिका आहे. आणि आजही न्यायालय आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे दिसते हा संप औद्योगिक न्यायालयाने या पूर्वीच बेकायदेशीर ठरवलेला आहे .त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने या संपाबबात कामगार बॅफूटवर आहेत. समितीला विलीनीकरण बाबत अहवाल द्यायला जवळपास तीन महिन्याची मुदत आहे टॉवर हा संप चालू ठेवणे कामगारांच्या दृष्टीने कठीण आहे कारण एस टी महामंडळा या संपाच्या बाबत निर्णायक भूमिकेत असून आतापर्यंत ४हजार कामगारांना निलंबित करण्यात आले आहे आज ही बाब सरकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून देईल त्यानंतर न्यायालय काय भूमिका घेते हे संपाच a दृष्टीने खूपच महत्वाचे ठरणार आहे दरम्यान संपकरी महिलांनी परिवहन मंत्र्यांच्या घरावर्वमोरचा काढण्याचा निर्णय घेतला आहे

error: Content is protected !!