ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पावसाला न जुमानता आन्दोलक संपावर ठाम -आज सरकारचे तेरावे घालत केला निषेध

काही आन्दोलकांना ठंडी ताप ,औषधे घेऊन आंदोलनात

आंध्र प्रदेशात झाले तर महाराष्ट्रात का नाही होत ?

मुंबई- आज सकाळ पासून आझाद मैदानात वातावरण गरम होते. सरकार नेमकी कोणाशी चर्चा करावी असेच पालुपद लावीत आहे तर आम्ही चर्चेस तयार आहोत असे एसटी कामगार म्हणत आहेत.सरकारने विलीनीकरण करावे अशी एकच मागणी सतत होतेय.
चार दिवस रात्रीचा पाऊस पडतोय त्यात भिजल्यामुळे काही जणांना ठंडीताप आलाय त्यांनी डॉक्टरांकडून औषध आणून घेतले आहे.त्यातच आज सरकारचे तेरावे घालून जाहिर निषेध करण्यात आला.

📌 आझाद मैदानात आन्दोलक महिला एसटी वाहक संतप्त

गेली 4 दिवस रात्री च्या पावसात आन्दोलक भिजत आहेत.पावसाची तमा न बाळगता आम्ही आन्दोलन करीत आहोत. दिवसभर उन्हाची ताप आणि त्यात रात्रिचा पाऊस पहाटचा गारवाही असल्याने थोड़े आजारल्या सारखे झाले आहे औषधे घेत पुन्हा नव्या जोमाने आंदोलनात आहोत.रात्रि लाईट नाही,निवारा नाही, शौचालयात पाणी नाही,
मच्छर चाऊन ठंडीताप येऊ लागला आहे, आता जीव गेला तरी बेहत्तर
आम्ही विलीनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही.
राज्य सरकाने चर्चा न करता ज्या प्रमाणे आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी अवघ्या तीन दिवसात एपीएसआरटीसी चे राज्यसरकार मध्ये विलीनीकरण केले अगदी तस्सेच महाराष्ट्रातही व्हावे अशी मागणी महिला एसटी वाहक सविता पवार (अक्कोल कोट डेपो) यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!