ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

मुंबई बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकारी पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकारी पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले
मुंबई बँकेचे अध्यक्ष व विधानसभा परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 21 पैकी 17 जागांवर निवडून आले. आता केवळ चार जागांवर निवडणूक होणे बाकी आहे.
बिनविरोध विजयी उमेदवार
प्रवीण दरेकर, शिवाजी नलावडे ,प्रसाद लाड, सुनील राऊत, सिद्धार्थ कांबळे ,नंदकुमार काटकर ,संदीप घनदाट ,अभिषेक घोसाळकर ,आनंदराव भोळे, विष्णू घुमरे ,जिजाबा पवार , सोनदेव पाटील ,विनोद बोरसे, नितीन बनकर, शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख.
चार जागांसाठी निवडणूक
विठ्ठल राव भोसले, पुरुषोत्तम दळवी, अनील गजरे, जयश्री पांचाळ.

error: Content is protected !!