ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

जगावर पुन्हा कोरोनाचे संकट- राहुल गांधींना भारत जोडो यात्रा थांबवण्याच्या सूचना


दिल्ली – जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आले असून चीनमध्ये कोरोनाचे १० लाख रुग्ण असल्याची माहिती उघडीस आली आहे . त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतातील सर्व राज्यांना कोरोना नियमांचे नव्याने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे तसेच कोरोना नियमांचे पालन करा नाहीतर भारत जोडो यात्रा थांबवा अशी विंनती आरोग्यमंत्र्यांनी राहुल गांधींना केली आहे. आज आरोग्य विभागाची एक महत्वाची बैठक मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांसोबत होणार असल्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले

चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढवण्यासाठी जबाबदार असलेल्या ओमायक्रॉन सबवेरियंट BF.7 ची तीन प्रकरणे भारतातही आढळून आली आहेत. गुजरातमध्ये दोन आणि ओडिशातील एक प्रकरण समोर आले आहे. यामुळेच भारत सरकार कोरोनाबाबत पूर्णपणे सतर्क झाले आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनीही बुधवारी सांगितले की, कोरोना अद्याप संपलेला नाही. यातच केंद्रीय मंत्र्यासोबतच्या बैठकीनंतर निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले. भारतातील पात्र लोकसंख्येपैकी केवळ 27-28 टक्के लोकांनी कोविड-19 साठी प्रतिबंधात्मक डोस घेतला आहे हे लक्षात घेऊन, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल यांनी गर्दीच्या ठिकाणी लसीकरण करून मास्क वापरण्याचा सल्ला दिला. पॉल म्हणाले, “लोकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे. ज्यांना आधीच आजार आहे किंवा वृद्ध आहेत त्यांनी विशेषतः त्याचे पालन करावे.”
दरम्यान, चीनमध्ये कोरोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ‘द इकॉनॉमिस्ट’मध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, लोकांना संसर्ग होण्याचे प्रमाण आणि इतर परिस्थितीच्या अभ्यासावर आधारित सुमारे 15 लाख चिनी नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे आकडे पाहता असं लक्षात येत की, चीनमध्ये निर्बंध शिथिल केल्यानंतर 13 लाख ते 21 लाख लोकांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू होऊ शकतो.

error: Content is protected !!