ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार याना ५ वर्षांची शिक्षा

नागपूर – बहुचर्चित नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा बँक घोटाळ्यात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्यासह पाचजण दोषी आढळले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांना 5 वर्ष शिक्षा आणि 12.5 लाखांचा दंड ठोठावला आहे. तर या घोटाळ्याप्रकरणी तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. केदार यांना 5 वर्ष शिक्षा झाल्याने आमदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच केदार यांना शिक्षा झाल्याने काँग्रेसला विदर्भात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
नागपूर जिल्हा बँकेत झालेल्या 125 कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तत्कालीन अध्यक्ष काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी बँकेच्या रकमेतून 2001 -02 मध्ये होमट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रा मनी मर्चंट लिमिटेड आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकार प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या. सहकार विभागाच्या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही गुंतवणूक झाली होती. पुढे खासगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसे बुडाले आणि याच प्रकरणात केदार आणि अन्य आरोपींवर गुन्हे नोंदविण्यात आले

error: Content is protected !!