ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

बाळासाहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही- उद्धव ठाकरे


मुंबई – निवडणूक जिंकायच्या असतील तर बाळासाहेबांच्या शिवाय पर्याय नाही . हिम्मत असेल तर मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकून दाखवा असे उघड आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला केले आहे. तसेच गद्दार विकत घेता येऊ शकतात पण गर्दीचे चैतन्य विकत घेता येत नाही असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज बाळासाहेब ठाकरे, प्रमोद नवलकर आणि सुभाषबाबुंचा जन्मदिवस आहे. आज विधानभवनात तैलचित्राचं अनावरण होतंय. मला दुपारी तैलचित्राबद्दल विचारलं, तेव्हा मी म्हटलं मी अजून तैलचित्र बघितलं नाही. ज्या कलाकाराने चित्र चितारलं असेल, त्यांचा मला अपमान करायचा नाही, पण हे चित्र काढण्यासाठी पुरेसा वेळ दिला का? हे विचारणं गरजेचं आहे. घाई-गडबडीत काहीतरी रंगवून ठेवायचं आणि म्हणायचं ‘हे घे तुझे वडील’ असं अजिबात चालणार नाही.
एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “दसरा मेळाव्यात ‘वडील चोरणारी औलाद’ असा उल्लेख मी केला होता. आता दुसऱ्यांचे वडील चोरता-चोरता स्वत:चे वडील लक्षात ठेवा, नाहीतर ते तुम्ही विसरायचे. वडील कोण? असं विचारलं तर ‘काय माहिती’ म्हणाल. कारण इकडे शिवसेनाप्रमुखांचे विचार, तिकडे ‘मोदी का आदमी’, काल म्हणाले शरद पवार ‘गोड माणूस’ आहे.” तुम्ही नक्की कुणाचे फोटो लावणार आहात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला

“महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना सरकार का पाडलं? तर हिंदुत्व सोडलं आणि शरद पवारांच्या आहारी गेले, म्हणून सरकार पाडलं असं सांगितलं. पण आता हेच काल सांगतात शरद पवार खूप गोड माणूस आहे. मी फोनवरून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. मग मी काय घेत होतो?” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र लावत आहात, तुमची कृती चांगली आहे. मला त्याचा आनंद आहे, अभिमान आहे. पण तुमचा त्यामागचा हेतू वाईट आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

error: Content is protected !!