ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मी बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार – राज ठाकरे

मुंबई – मी बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार आहे. बाळासाहेबांना मी लहानपणापासून पहिले त्यांच्या छायेखाली वाढलो म्हणूनच त्यांच्या विचारांचा वर घेऊन पुढे निघालो आहे असे माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरण प्रसंगी बोलताना सांगितले यावेळी त्यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेतही बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण आज करण्यात आले. यावेळी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाषण करत स्व. बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या. स्व. बाळासाहेबांच्या नावाच्या अगोदर जवळपास तीन ते सव्वातीन वर्षांनंतर हिंदूहृदयसम्राट हे नाव लागत आहे, त्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे राज ठाकरे यांनी अभिनंदन व्यक्त केले. तसेच मी बाळासाहेबांचा वैचारीक वारसदार असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जबरदस्त टोलेबाजी केली.

या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असलेले अनेकजण आणि उपस्थित नसलेले अनेकजण… यांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले, “ज्या व्यक्तीमुळे ही विधानभवनाची इमारत तुम्हाला बघायला मिळाली त्या स्व. बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र या इमारतीमध्ये लागत आहे, त्याबद्दल अभिमान वाटतो. शेकड्याने लोक विधानभवनात आली, मा. बाळासाहेबांनी त्यांना इथे पाठवले. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विनंती आहे की त्यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेतही बाळासाहेबांचे तैलचित्र लावावे. म्हणजे आपण कुणामुळे विधान भवनात आलो, हे त्यांना कळेल.”असेही त्यांनी सांगितले .

error: Content is protected !!