ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

देशभर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा – आज पासून राम मंदिर सर्व भाविकांसाठी खुले


अयोध्या/पाचशे वर्षांच्या तीव्र संघर्षानंतर अखेर अयोध्येत राम मंदिर उभे राहिले आणि राम मंदिरात रामलीलाच्या मूर्तीची विधी वत प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी संपूर्ण अयोध्या नगरी एखाद्या नववधूप्रमाणे नटली होती पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सगळा पार पडल्यानंतर सायंकाळी शरीराच्या तीरावर महाआरती करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये महानायक अमिताभ बच्चन रजनीकांत संपूर्ण अंबानी कुटुंबीय केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि राम मंदिर बांधणाऱ्या कामगारांचा ही समावेश होता अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना देशभरातील सर्व मंदिरांमध्ये दीपप्रज्वलित करण्यात आले तसेच देशाच्या विविध भागात महापूजा आयोजन करण्यात आले होते संपूर्ण देश उत्साह आणि आनंदात होता मुंबईत सायंकाळी शिंदे गटाकडून शिवाजी पार्क ते भोईवाडाच्या नाम मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शोभायात्रेत सामील झालेले होते हा उत्सा ह संपूर्ण देशभर दिसत होता दरम्यान आज पासून म्हणजेच मंगळवार पासून राम मंदिर सर्व भाविकांसाठी खुले झाले आहे सकाळी सात ते साडेअकरा आणि दुपारी दोन ते रात्री नऊ अशा वेळेत राम भक्तांना प्रभू रामाचे दर्शन घेता येईल आज पहिल्याच दिवशी राम मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी उजळली होती आणि पुढील वर्षभर ही गर्दी अशीच कायम राहणार आहे

error: Content is protected !!