ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

नवाब मलिक याना ३ मार्च पर्यंत ई डी कोठडी


मुंबई/ महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा यांच्यातील संघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन ठेपलेल्या आहे .कारण कुर्ल्यातील जमीन घोटाळा प्रकरणी काल ई डी ने राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे आणि 7 तासाच्या चौकशीनंतर अटक केली. न्यायालयाने मलिक यांना 3 मार्च पर्यंत ई डी कोठडी दिली आहे. दरम्यान या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारं आणि ई डी चां विरोधात आंदोलन सुरू केले आहे .
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील जमीन घोटाळ्याची माहिती दिली होती. त्यानंतर सध्या अटकेत असलेला दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याने चौकशीत नवाब मलिक यांचे नाव घेतल्याने काल पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ई डी चे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी गेले आणि त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यानंतर ई डी कार्यालयात त्यांची 7 तास चौकशी करण्यात आली ही चौकशी कुर्ल्यातील जमीन घोटाळ्याशी संबंधित असल्याचे समजते .कुर्ल्यातील गांजवला कंपाऊंड येथील तीन एकर जमीन मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांनी 30 लाख रुपयांत शहा वली खान याच्याकडून घेतली आणि त्याची पॉवर ऑफ अटरनी हसीना ड्रायव्हर सलीम पटेल याच्याकडे आहे तर शहा वली खान हा 1993 चां बॉम्ब स्फोटातील आरोपी आहे.2503 प्रति स्क्वेअर फीट इतका रेट असतानाही ही जमीन फक्त 25 रुपये स्क्वेअर फीट दराने फराज मलिक यांनी कवडीमोल भावात घेतली तसेच शहा वलीला फक्त २० लाख दिले असे हे प्रकरण आहे आणि याच प्रकरणात नवाब मलिक यांचे दाऊद बरोबर संबंध जोडून ई डी मलिक यांची चौकशी करीत असून अनिल देशमुख यांच्या प्रमाणेच मलिक यांनीही सदर प्रकरणात अटक झाली आहे या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन सुरू केले आहे
बॉक्स
याची कल्पना होती/ शरद पवार
नवाब मलिक हे ज्या पद्धतीने लोकांच्या समोर सत्य उघडकीस आणीत आहेत केंद्र सरकारच्या विरुद्ध बोलत आहेत त्यामुळे कधीतरी कुठले प्रकरण बाहेर कडून मलिक यांच्यावर कारवाई होऊ शकते याची आम्हाला कल्पना होती आणि शेवटी तसेच झाले असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे

error: Content is protected !!