लैंगिक शिक्षण आणि समोपदेशन कीट
माणसाने काळानुसार बदलायला हवे मात्र हा बदल घडवताना त्या बदलाला अनुरूप अशी साजाची मानसिकता सुधा बदलणे गरजेचे आहे.पण स्वातंत्र्याला 70 वर्ष उलटून गेली तरी सुधा काही गोष्टीत अजूनही सामाजिक बदल झालेला दिसत नाही .परिणामी समाज अजूनही जुनाट आणि बुरसटलेल्या रूढी परंपरा आणि पाप पुण्याच्या डबक्यात घुटमळत आहे .लैंगीक सुरक्षा,लैंगीक सावधानता आणि स्वच्छता याबाबत पौगंड अवस्थेत मुलांना शिक्षण मिळायला हवे.कारण आपले शरीर आणि शारीरिक अवयव याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे कारण त्या अवयवांची निगा आणि सुरक्षा जर व्यवस्थित राखता आली नाही तर त्या अवयवांचा आपल्याला योग्य वापर करता येणार नाही .म्हणूनच हात पाय डोळे तोंड नाक कान आणि अन्य शारीरिक अवयवांच्या बद्दल ज्या प्रमाणे आपण बोलतो आपल्या अडचणी सांगतो त्याच प्रमाणे लिंग याबद्दल कुणी फारशी माहिती चार्षा करीत नाही.कारण लिंग या अवयवाला पाप पुण्य रीती रीवाज मर्यादा संकोच या गोष्टींशी जोडण्यात आले आहे त्यामुळे मूत्र विसर्जन आणि संतती निर्मिती एवढीच या अवयव विषयी आपणास माहिती आहे.पण भविष्यात त्यातून अनेक अडचणी आणि गैरसमज निर्माण होऊन माणसाचे सांसारिक जीवन उद्ध्वस्त होऊ शकते.म्हणूनच लैंगिक शिक्षण आवश्यक आहे.खास करून ग्रामीण भागातील महिलांसाठी हे लैंगिक शिक्षण खूपच महत्वाचे आहे .कारण लैंगिक शिक्षण नसल्यामुळे ग्रामीण भागातील महिला चुकीच्या गोष्टींना बळी पडत आहे आणि हे सर्व येवढ्या साठी सांगायचे आहे की केंद्र आणि राज्य सरकारने मिळून कुटुंब नियोजनाचा जो एक कार्यक्रम हाती घेतला आहे त्या अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांचे कुटुंबनियोजन बाबत समोपदेशन केले जाते आहे त्यासाठी एक समोपदेश न कीट देण्यात येणार आहे त्या कीट मध्ये रबरी लिंगाचा समावेश आहे आणि त्यावरून मोठे वादळ उठलं आहे.आता याबाबत दोन्ही बाजूने विचार करायचा झाल्यास सरकारने ग्रामीण भागातील सामाजिक स्थितीचा आढावा घेऊनच या कीट मध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात याचा निर्णय घ्यायला हवा होता तसे पाहता प्रत्येक राजकीय पक्षांकडे मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या आहेत आणि त्यांचा वापर फक्त आंदोलनासाठी केला जातो .याच महिला कार्यकर्त्यांवर जर ग्रामीण भागातील महिलांच्या लैंगिक शिक्षणाची जबाबदारी सोपवली असती उदरणार्थ एका गावसाठी चार महिला आणि त्यांच्या सोबत एक महिला डॉकटर असे एक पथक तयार करून जर या पथकाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील घराघरात जाऊन महिलांमध्ये लैंगिक शिक्षणाचा प्रसार केला असता आणि या मोहिमेला आरोग्य विषयक सुरक्षेची जोड दिली असती तर ग्रामीण भागातील महिला असोत किंवा अंगणवाडी सेविका यांच्यातील संकोच कमी झाला असता आणि त्यानंतर कीट मध्ये रबरी लिंग ठेऊन त्याच्याशी संबंधित कुटुंब नियोजन पद्धतीची माहिती देण्याची प्रक्रिया सुरू केली असती तर अशा गोष्टींना फारसा विरोध झाला नसता कुटुंब समोपदेशन कीट मध्ये रबरी लिंगाचा समावेश असणे गैर नाही तो लैंगिक शिक्षणाचाच एक भाग आहे पण या मोहिमेच्या पूर्वी जर जन जागृती केली असती किंवा ही मोहीम ज्या अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे त्यांच्या मनातील संकोच दूर करण्यासाठी त्यांचे अगोदर समुपदेशन केले असते तर ही मोहीम त्यांनी निःसंकोचपणे राबवली असती
पण सरकारने तसे न करता या मोहिमेच्या माध्यमातून सरळ सरळ ग्रामीण भागातील शालीन सामाजिक व्यवस्थेला च धक्का लावलाय त्यामुळे रबरी लिंगाच्या बाबतीत वाढ निर्माण झालाय मुंबई सारख्या महानगरात सुशिक्षित महिलांमध्ये लैंगिक साक्षरता मोठ्या प्रमाणावर आहे ज्यात लैंगिक स्वच्छता,सुरक्षित लैंगिक संबंध याबाबत शहरी महिला जागरूक आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी असे कृत्रिम अवयव आणि त्याची माहिती ही काही नवीन बाब नाही.उलट काही उच्च शिक्षित आणि एकाकी राहणाऱ्या महिला कृत्रिम साधने वापरतात.पण ग्रामीण भागात तसे नाही तिथे आजही देव धर्म रूढी परंपरा पाप पुण्य या सगळ्या गोष्टींना खूप महत्वाचे स्थान आहे त्यामुळे लैंगिक बाब ही त्यांच्यासाठी मोठी संकोचीत असते.म्हणूनच जन्मदात्या आईलाही आपल्या मुलिसमोर आल्या गोष्टी बोलणे किंवा तिला याबाबत समोपदेश दोन गोष्टी सांगणे संकोचीतपणाचे वाटत असते त्यामुळे जिथे असल्या विषयावर आई आणि मुलीचा किंवा मोठ्या अनुभवी विवाहित बहीण आणि लहान बहिणीचा या विषयावर संवाद होत नाही अशा सामाजिक माहोल मध्ये जर सरकार रबरी लिंगाचा सतोपदेशन कीट मध्ये समाविष्ट करणार असेल तर ग्रामीण भागातील महिला ते कसे स्वीकारतील आणि नेमका याच गोष्टीचा सरकारने विचार केला नाही त्यामुळेच सरकारची एक चांगली योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे.आजच्या प्रत्येक मुलीला आणि महिलांनाही लैंगिक शिक्षण मिळायला हवे लैंगिक शिक्षण म्हणजे व्यभिचार किंवा पाप आहे अशी जी महिलांमध्ये चुकीची समजूत आहे ती त्यांच्या डोक्यातून काढून टाकण्याची गरज आहे पण आमच्या राजकीय पक्षांना तेवढं वेळही नाही .आणि तेवढी सामाजिक परिपक्वता सुधा नाही आणि हेच या देशातील महिलांचे दुर्दैव आहे