कांद्यावरील २० टक्के निर्यात कर हटवला _ केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
नवी दिल्ली/कांद्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात आले आहेत खास करून कांद्यावरील निर्यात बंदी नंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले होते या सर्व पार्श्वभूमीवर आता कांद्यावरील 20 टक्के निर्यात कर मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे कांदा उत्पादकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे
कांद्यावरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती कांदा उत्पादकाला चार पैसे मिळण्याची वेळ येते तेव्हा केंद्राकडून कांद्यावर निर्यात बंदी घातली जाते तेव्हा किंवा कांद्याचे निर्यात शुल्क वाढवले जाते हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय आहे असे अमोल कोल्हे यांनी संसदेतील आपल्या भाषणात म्हटले होते तसेच महाराष्ट्रातल्या इतर खासदारांनीही कांद्याबाबत चिंता व्यक्त केली होती अखेर केंद्राने कांद्यावरील 20 टक्के निर्यात कर हटवला आहे मात्र कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये हमीभाव द्यावा ही मागणी मात्र मान्य झालेली नाही
