ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ऑनलाइन गेमिंग वर केंद्राचा सर्जिकल स्ट्राइक ३५७ वेब साईट ब्लॉक केल्या ७०० विदेशी इ कंपन्या रडारवर


नवी दिल्ली/भारतात बेकायदेशीरपणे ऑनलाईन गेमिंग चालवणाऱ्या कंपन्यांवर केंद्राने अक्षरशा सर्जिकल स्ट्राइक केला असून तब्बल ३५७ वेबसाईट ब्लॉक केले आहेत त्याचबरोबर ७०० ऑनलाइन गेमिंग चालवणाऱ्या कंपन्या केंद्राच्या रडारवर आहेत
विदेशी कंपन्यांच्या भारतातील ऑनलाईन गेमिंग वर कोट्यावधी रुपयांचा सट्टा लागतो याप्रकरणी आतापर्यंत काही सेलिब्रिटी सहअनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि आता भारतात चालणाऱ्या ऑनलाइन गेमिंगच्या तब्बल ३५७ वेबसाईट केंद्राने ब्लॉक केले आहेत. त्याचबरोबर डी जी आय ने या कंपन्यांची बँक खातीही गोठवून तब्बल २४०० कोटींची रक्कम जप्त केली आहे ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना हा फार मोठा धक्का असून अजून केंद्राच्या रडावर ७०० ऑनलाइन गेमिंग कंपन्या असल्याचे समजते आणि लवकरच या कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे केंद्राची नजर चुकवून भारतात बेकायदेशीर रित्या ऑनलाइन गेमिंग चालवणाऱ्या या कंपन्यांनी कोट्यावधी रुपयांचा जीएसटी कर बुडवलेला आहे तसेच अनेक कंपन्यांचे रजिस्ट्रेशन नाही ऑनलाईन कंपन्यांनी गेमिंग च्या माध्यमातून एक प्रकारे सट्टेबाजी सुरू केली होती त्यामुळेच या कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याचे समजते

error: Content is protected !!