नागपूर दंगली प्रकरणी आणखी दोघांना अटक शेवटच्या दंगलखोराला अटक होईपर्यंत कारवाई थांबणार नाही_ मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
नागपूर/नागपूर दंगली प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे यामध्ये मोहम्मद शहजाद खान आणि हबीब इंजिनियर या दोन एमडीपी नेत्यांचा समावेश आहे यातील इंजिनियर यांच्यावर या दंगलीची योजना आखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे दरम्यान या दंगलीला जबाबदार असलेल्या शेवटच्या दंगलखोराला अटक होईपर्यंत कारवाई थांबणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे
नागपूर दंगली प्रकरणी आत्तापर्यंत १०४ जणांना अटक करण्यात आली असून त्यातील ९२ सज्ञान तर १२ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे या सर्वांची सध्या पासून चौकशी करण्यात येत आहे तर आज मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि नागपूर मधील परिस्थितीचा आढावा घेतला कारण पुढील काही दिवसातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका मोठ्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अनेक बडे नेते नागपुरात येणार आहेत या पार्श्वभूमीवर नागपुरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्याचे काम स्वतः मुख्यमंत्र्यांनी हाती घेतले आहे म्हणूनच नागपूरमधील परिस्थितीवर ते स्वतः बारीक लक्ष ठेवून आहेत सध्या नागपूरमधील परिस्थिती शांत असली तरी कडेकोट पोलिसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्याचबरोबर दोन्ही समाजाच्या नेत्यांवर लक्ष ठेवले जात आहे भडकाऊ भाषण देणे तसेच इतर कोणत्याही अनुचित ऍक्टिव्हिटीज नागपूर मध्ये घडणार नाहीत याची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.
