ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अखेर फरारी अमृतपाल पोलिसांना शरण


अमृतसर -एक मोठी बातमी समोर येत असून, वारीस पंजाब दीचा प्रमुख फरार असलेला अमृतपाल सिंहला अखेर 36 दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने स्वतः आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी त्याला मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेत अटक केली आहे. अमृतपालला तब्बल ३६ दिवसांनी पोलिसांनी पकडले आहे. अजनाळा घटनेनंतर तो फरार झाला होता. तर त्याची पत्नी किरणदीप कौर हिला तीन दिवसांपूर्वी अमृतसर विमानतळावर गुरुवारी थांबवण्यात आले होते. त्यानंतर सोडून देण्यात आले होते. विशेष म्हणजे अमृतपाल सिंहच्या इतर साथीदारांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. अमृतपालची रवानगी दिब्रुगड तुरुंगात होऊ शकते.

खलिस्तानवादी अमृतपाल सिंगचा गेल्या ३६ दिवसांपासून पंजाब पोलिसांसह देशातील वेगवेगळ्या राज्यातील पोलिसांकडून शोध सुरु होता. विशेष म्हणजे देशातील महत्वाच्या सुरक्षा यंत्रणांकडून देखील त्याचा शोध सुरु होता, पण त्यांना यश मिळत नव्हते. तर आधी पटियाला, नंतर हरियाणातील शाहबाद आणि नंतर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी अशाप्रकारे अमृतपाल सतत आपली ठिकाणं बदलत होता. तसेच यूपी सीमेवरून ते नेपाळमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या बहराईचमधील सीमेवर बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मात्र एवढ करूनही अमृतपाल सिंहचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र आज अमृतपाल सिंहने स्वतःच आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी त्याला मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेत अटक केली आहे.

error: Content is protected !!