कोकणात राणेवर सामंत बंधूंची नाराजी कायम – राणेंच्या अडचणी वाढणार
कणकवली/ कोकणात महायुती मधे प्रचड नाराजी आहे.कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची जागा शिवसेनेची असताना ती भाजपने बळकावली याचा एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना राग असून याच रागातून ते राणेंच्या विरोधात प्रचार करण्याची शक्यता आहे त्यामुळे राणेंच्या अडचणी वाढणार आहेत.उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतलेली असली तरी त्यांची नाराजी कायम आहे
कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी तयारी केली होती आपल्या भावासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जोर लावला होता पण अपयश आले त्यानंतर ही जागा भाजपने बळकावून तिथून नारायण राणेंना तिकीट दिली आता राणे विरुद्ध विनायक राऊत असा थेट सामना होणार आहे
