ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना -राष्ट्रवादी भाई भाई

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीची लगीनघाई सुरु असतानाच, सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंनी उमेदवारी जाहीर केल्याने, निवडणुकीची राजकीय समीकरणे बदलू लागलीत. याच दरम्यान शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर करून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे.
दोन वर्षांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेकडून दुसरी जागा मागितली होती. त्यावेळी शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. तसेच पुढच्या वेळेला राष्ट्रवादीने आपल्याला सहकार्य करावे अशी मागणीही शिवसेनेने केली होती. त्यामुळे आम्ही आता राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवार संभाजीराजे असोत किंवा आणखी कुणी असोत आम्ही शिवसेनेला पाठिंबा देणार आहोत असे शरद पवार यांनी सांगितले. संभाजीराजे हे भाजपचे राज्यसभा खासदार होते. मात्र त्यांचे भाजपबरोबर बिनसले होते. त्यामुळे त्यांनी त्यांचा राज्यसभेचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तसेच पाठिंब्यासाठी त्यांनी २९ अपक्ष आमदारांना आपल्याला पाठिंबा देण्याचे यापूर्वीच आवाहन केले आहे. शिवाय पाठिंब्यासाठी शरद पवार यांचीही भेट घेतली होती . शरद पवार यांनीही संभाजीराजेना पाठिंबा दिला होता . मात्र भाजपने आपला तिसरा तर शिवसेनेने दुसरा उमेदवार उतरवण्याचे जाहीर केल्याने सहाव्या जागेचा तिढा निर्माण झाला आहे. कारण पक्षीय बलाबल पाहता भाजपचे २, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी १ उमेदवार निवडून येऊ शकतो . अशा स्थितीत शिवसेनेकडून संभाजी राजेना पाठिंबा देण्याची चर्चा सुरु आहे. अर्थात त्यावर कोणताही निर्णय होवो राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्याला पाठिबा दिला जाणार आहे.

error: Content is protected !!