ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबईराजकीय

युपी प्रमाणे मुंबईत कधी बुलडोझर फिरणार

मुंबई/ युपितील माफियांना अद्दल घडवण्यासाठी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर फिरवले त्यांची बेनामी संपती जप्त केली.आणि या कारवाईतून अतीक मोहंमद आणि राजा भय्या सारख्या कुख्यात माफियाही सुटले नाहीत. मग हे जर युपिमध्ये होऊ शकते तर मुंबईत का नाही मुंबईत बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि मदत करणारे , गुंड टोळ्या, सरकारी जागा हडप करणारे माफीया, राजकीय सिडीकेट यांची आजही अब्जावधी रुपयांची बेनामी संपती मुंबईत आहे .यातले काही माफिया आज हयात नसले तरी त्यांचे वारसदार या बेनामी संप्तीचा उपभोग घेत आहेत . दक्षिण मुंबईत अशा हजारो मालमत्ता आहेत. ज्यात टॉवर, शॉपिंग मॉल, कंपन्या यासारखे व्यवसाय आहेत त्यावर कधी बुलडोझर फिरविणार .पालिकेत खैरनार नावाच्या एका उपायुक्तांनी दाऊदच्या बायकोच्या नावे असलेल्या जे जे हॉस्पिटल जवळच्या मेहजबीन या बेकायदेशीर इमारतीवर हातोडा चालवण्याचे धाडस दाखवले होते . त्याला मुंबईकरांचा मोठा पाठिंबा लाभला कौतुक झाले पण आज महापलिकेत चोर व चांडाळ बसलेले असल्यामुळेच माफियांच्या संपत्तीवर बुलडोझर चालवला जात नाही . पापन्याना किती दिवस सांभाळणार एक ना एक दिवस हे माफिया राज्यकर्त्यांच्या पोटावर बसतील तेंव्हा त्यांना आपली चूक कळेल असे आज मुंबईकर म्हणत आहेत

error: Content is protected !!