ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

जयंत पाटील यांची ईडीकडून साडेनऊ तास चौकशी

मुंबई, -तब्बल साडेनऊ तासांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीची चौकशी संपली आहे. चौकशी संपल्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. कार्यालयामध्ये दाखल झाल्यानंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तसंच त्यांचे आभार मानले.
ईडीच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली. ईडीकडे आता प्रश्न शिल्लक नसतील. चौकशीदरम्यान आपलं अर्ध पुस्तक वाचून झालं. माझा या कंपनीशी कधीही संबंध आला नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चांगली वागणूक दिली, असं जयंत पाटील म्हणाले.
आयएलएफएस प्रकरणी ईडीने जयंत पाटील यांची साडेनऊ तास चौकशी केली. ईडी कार्यालयात रवाना होण्यापूर्वी जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं
ईडीने बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर अखेर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी चौकशीला सामोरे गेले. परंतु ते जाण्यापूर्वी मोठया प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी ईडी कार्यालय आणि राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर दिसून आली होती.ईडी चौकशीविरोधात मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर तसेच इतर जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. बरेच पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईला येऊ नये असं आवाहन जयंत पाटील यांनी चौकशीला जाण्यापूर्वी केले होते.

error: Content is protected !!