नालेसफाईची श्वेत पत्रिका काढा
मुंबई – महापालिकेचा 75 टक्के नालेसफाईचा दावा खोटा आहे. हा दावा रतन खत्रीच्या आकड्याप्रमाणे असल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. या आरोपामुळे शिवसेना एकनाथ शिंदे च्या पक्षात आणि विरोधकांमध्ये खळबळ माजली आहे.
मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्या आधी गाळ उपसा करण्याचे लक्ष ठेवते परंतु कधी शंभर टक्के नालेसफाईचा दावा करत नाही. यावेळी लक्ष दहा लाख टन गाळ उपसाचे ठेवले होते. सध्या नऊ लाख टन उपसा करण्यात आल्याची माहिती पालिका पर्जन्य विभागाने दिली परंतु यावरच आशिष शेलार यांनी आक्षेप घेत. नाला सफाई कामाची पाहणी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी करून त्याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली आहे.
