ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पावसाळी जाळ्या सफाईच्या कामात कंत्राटदार व पालिका अधिकार्‍यांचे आर्थिक साटेलोटे ?- मनुष्यबळ पुरवतात खाजगी संस्था पण त्या कामाचा मलिदा मात्र कंत्राटदारांला

मुंबई-(किसन जाधव) पालिकेच्या कंत्राटदारांकडून आतापर्यंत नालेसफाईच्या कामातच पालिकेला चुना लावला जायचा पण आता शहरातील रस्त्यावरची पावसाळी जाळ्या साफ करण्याच्या कामात सुधा पालिकेला चुना लावला जातोय. कंत्राटदार नुसता बोली बच्चन करून, कामात लागणारी मजूर त्याच्याकडे नसल्यामुळे प्रभागातील कार्यरत संस्था कडील मजूर लावून काम करून घेत असल्याची माहिती पुढे आली आहे .पर्जन्य जलवाहिनी प्रभागातील अभियंते या कंत्राटावर मेहरबान का प्रश्‍न असा जागोजागी विचारले जातो
पावसाळा आधी जाळया वाहिन्यांची सफाई 70 तक्के कामे करायची असतात आणि उर्वरित 30 तक्के कामे पावसाळ्यात करायची असतात या कामासाठी पालिका टेंडर कडून कंत्राटदार नेमते पण सध्या पालिकेच्या ए, बी, सी, डी आणि ई विभागात पावसाळी जाळ्या सफाईचे काम एस. एम. डेव्हलपर कंत्राटदार कंपनीकडे देण्यात आले आहे . सदर कंपनीकडे पावसाळी जाळ्यात साफ करण्याच्या कामाचा कोणताही अनुभव नसताना ,पालिकेने या कंपनीवर मेहरबानी करून कंत्राट काम कसे दिले. त्यांच्याकडे कामगारच नसतात त्यामुळे कंत्राटदाराकडून कामगारांनी करायची कामे पालिकेचे खाजगी संस्थांचे कर्मचारी करीत आहेत आणि त्यासाठी पालिका अधिकार्‍यांना कंत्राटदाराकडून टक्केवरी देण्यात आल्याची विश्‍वसनीय माहिती आहे तशी पालिका कर्मचारी वर्तुळात चर्चा आहे. कुठल्याही कामाचे जेंव्हा कंत्राट दिले जाते तेंव्हा ते काम कंत्राटदारांकडे मनुष्यबळ कामे करीत असतात त्यासाठी पुरेशा प्रमाणात कंत्राटदार कंपनीकडे मनुष्यबळ असावे लागते पण पालिकेच्या पाचही प्रभागात पावसाळी वाहिन्यांच्या सफाईचे कामात संस्थेच्या कर्मचार्‍यांकडून करून घेतले जात असल्याचे समजते आणि या कामाचे 100 टक्के पैसे कंत्राटदार घेतोय. त्यातील काही टक्के रक्कम संबंधित विभागाच्या पालिका अधिकार्‍याला दिली जातेय हा मोठा भ्रष्टाचार ,घोटाळा असून पर्जन्य वाहिन्यांच्या सफाईचे कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आले आहे. त्या कंपनीच्या कामाची चौकशी करून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा तसेच या कंत्राटदारावर पालिकेच्या ज्या अधिकार्‍याचा हलगर्जीपणा चालावला यावर तत्काळ कारवाई करावी आणि पालिकेची लूट थांबवावी अशी जनतेची मागणी आहे. या सर्व गौंडबंगालाची पालिका आयुक्त चहल आणि अति.आयुक्त हर्डीकर, वेलरासू, उपायुक्त संगीता हसनाळे यांनी कसून चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी मुंबईतील सामाजिक संघटनांनी केली आहे.

प.जा.वा.विभाग वार्डातील अभिंयते जागे कधी होणार ?
प्रभाग ए बी सी डी आणि ई मधील या कामावर देखरेख करणारे अभियंते भडमे,रत्नपारखी, पाटील, आव्हाड, मुलानी अशा अधिकार्‍याची नेमणूक केली आहे . परंतु हे अधिकारी कंत्राट कामागारावर उदार धोरण रबिवल्याने कंत्राटदार आज २० जून तारीख उलटून गेली तरी त्याच्याकडून पर्जन्य जलवाहिनी साफ होत नाहीत. याची तक्रार नागरीकाकडून होत आहे. यामुळे पावसाळयात पाणी तुंबण्याची शक्यता असून याला कारणीभूत प्रभागातील कंत्राटदाराचा आणि अभिंयताचा हलगर्जीपणा असणार आहे. हे अधिकारी करतात काय असा प्रश्‍न पडतो.

20 जून उलटले तरी पावसाळी जाळ्यातला गाळ न काढल्याने मुंबईची तुंबापुरी होणार –
खालील रस्त्यावर पाहणी केले असता अद्याप गाळ जाळयामध्ये पडुन आहे याला जबाबदार कोण?े
ए प्रभाग–बोराबाजार,बाजार गेट ‘ भगतसिंग रोड
बी प्रभाग–दाणाबंदर रोड,मजिदबंदर
सी प्रभाग चोरबाजार, राममंदीर,कुंभारवाडा, ईस्लामपुरा, सिक्कानगर
डी प्रभाग- -बलवाज हाटेल,ग्रण्टरोड.खेतवाडी,चर्णीरोड,
ई प्रभाग–घोडपदेव क्रास रोड-1,वाडीबंदर ,डाकीया रोड, बे.पै.नाथ रोड.

error: Content is protected !!