ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

महापालिकांची नवी आरक्षण सोडत 29 जुलैला

मुंबई / ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यामुळे जुनी सोडत रद्द करण्यात आली असून नवी सोडत 29 जुलैला काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत

सोडतीचा कार्यक्रमही आता जाहीर झाला असून ५ ते ८ ऑगस्टपर्यंत अंतिम आरक्षण सोडत निघणार आहे. यामध्ये अनुसुचित जाती आणि जमातीचं आरक्षण सोडत कायम राहणार आहे. कारण हे आरक्षण लोकसंख्येनुसार काढलं जातं त्यामुळं यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. पण महिलांचं जे आरक्षण आहे ते रद्द करुन त्यामध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण नव्यानं निघणार आहे. निवडणूक आयोगाचा हा महत्वाचा निर्णय आहे.
राज्यातील मुंबई महापालिकेसह १३ महापालिका निवडणुका, २५ जिल्हा परिषदा २८४ पंचायत समित्या यांची निवडणूक जाहीर झाली होती. यासाठी आरक्षण सोडतही निघाली होती. पण आता दोन दिवसांपूर्वीच ओबीसी आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे. त्यामुळं या सर्व निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार असल्यानं आता या सर्व निवडणुकांसाठी नव्यानं आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

error: Content is protected !!