शरद पवार हे भ्रष्टाचारायचे सरदार – अमित शहा यांचा घणाघात
पुणे/भ्रष्टाचाराला सुरुवातीपासून खत पाणी घालून भ्रष्टाचाराला मदत करणारे, आणि भ्रष्टाचार वाढवणारे शरद पवार हे भ्रष्टाचारचे सरदार आहेत अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा प्रणित महायुतीचेच सरकार ये. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहनही त्यांनी केले.
रविवारी पुण्यात भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, विधानसभेच्या निवडणुकीत गाफील राहू नका. विजय आपलाच होणार आहे. कारण पंतप्रधान मोदी यांनी जनतेसाठी ज्या काही चांगल्या योजना आणलेल्या आहेत, महाराष्ट्र सरकारने महिलासाठी लाडकी बहीण योजना यासारख्या काही चांगल्या योजना आणलेल्या आहेत, त्यामुळे लोक विरोधकांच्या फुलथापांना बळी पडणार नाहीत .परंतु आपल्याला सतर्क राहायला हवे. लोकांपर्यंत पोहोचायला हवे. भाजपाची ध्येय धोरणे आणि केलेली कामे लोकांना सांगायला हवीत. तरच आपल्याला मोठे यश मिळू शकते असे शहा यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांच्यावर घनाघाती हल्ला करताना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा विरोधकाना काहीही अधिकार नाही. कारण भ्रष्टाचाराचे महामेरू म्हणजेच सरदार खुद्द शरद पवार आहेत. शरद पवार यांच्यामुळेच महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात भ्रष्टाचाराला चालना मिळाली. त्यामुळे भ्रष्टाचारावर बोलायचा विरोधकांना अधिकारच नाही. मागच्या निवडणुकीत खोटा नेरेटीव सेट करून त्यांनी थोडेफार यश मिळवले. परंतु मोदींच्या विरोधात प्रचार करून सुद्धा त्यांना सत्तेवर येता आले नाही. लोकांनी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवले. ही वस्तुस्थिती विसरून चालता चालणार नाही. असेही शहा यांनी सांगितले. व कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी जोमाने तयारीला लागा असे आवाहन केले.
