ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

हिंदूंच्याच सणांवर निर्बंध का?


मुंबई/ करोनाचे संकट आहे हे जरी खरे असेल तरी आता करेनाचा प्रादुर्भाव हळू हळू कमी होत आहे असे असताना सरकारने गणेशोत्सवावर निर्बंध लावले आणि आता दहीहंडी उत्सव सुद्धा रद्द करायला लावलाय हा एक प्रकारे अन्याय असून हिंदूंच्याच सणांवर निर्बंध का ? असा थेट सवाल माझी महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवाणजी यांनी केलाय
शिवसेना आता हिंदुत्व विसरली आहे असे वाटायला लागले आहे कारण करोनाचा प्रभाव कमी झाला आणि सर्व काही उघडण्याची परवानगी दिलेली असताना सरकार मंदिरे उघडायला मात्र परवानगी का देत नाही तेच काळात नाही.सरकार एकीकडे मंदिरे उघडायला देत नाही तर दुसरीकडे हिंदूंच्या सणांवर सुधा निर्बंध पडले जात आहेत . काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोविंदा समन्वय समितीची बैठक घेऊन करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवून दहीहंडी उत्सव रद्द करायला लावला पण भाजपला मात्र सरकारचा हा निर्णय मान्य नसून आम्ही दहीहंडी उत्सव करणारच असे बाबूभाई भवाणजी यांनी ठामपणे सांगितले.सरकार सरसकट सणाच्या बाबतीत निर्णय घेऊ शकत नाही तुम्ही सण साजरे करण्या आधीचे नियम आखून द्या आम्ही त्याचे पालन करू पण सणांवर बंदी घालण्याचा प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही असा इशाराच बाबूभाई यांनी दिला आहे

error: Content is protected !!